संगमनेरात गौ ग्राम परिक्रमा काढून वसुबारस साजरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात गौ ग्राम परिक्रमा काढून वसुबारस साजरी

संगमनेर/प्रतिनिधी।१वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस त्यानिमित्ताने सर्वांना गो मातेचे पूजन करता यावे, म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गो भक्तांनी स

प्रभाग 11 मधील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन – अविनाश घुले
पोलिस अधिकार्‍याकडून मारहाण… उपोषणाचा इशारा
शेततळ्यात बुडून बापलेकासह भाच्याचा मृत्यू l पहा LokNews24

संगमनेर/प्रतिनिधी।१वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस त्यानिमित्ताने सर्वांना गो मातेचे पूजन करता यावे, म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल व गो भक्तांनी संगमनेर शहरात “गो ग्राम परिक्रमा” काढली. या उपक्रमास संगमनेरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आज सोमवार दि.१ रोजी सकाळी ७ वा. अकोले नाका येथून गौ ग्राम परिक्रमेची सुरुवात कैलास सोमाणी व राजेश दोषी यांनी सपत्निक व श्रीराम झंवर सर सपत्नीक यांच्या हस्ते गो मातेचे पूजन करून “गो ग्राम परिक्रमेची” सुरुवात झाली. परिक्रमा अकोले नाका, माळीवाडा, साईनाथ चौक, चावडी, मेनरोड, श्रीकृष्ण मंदीर, सहस्त्रार्जुन चौक, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, बाजार पेठ, गांधी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, साळीवाडा, कॅ. लक्ष्मी चौक, रंगारगल्ली, तांदुळ बाजार, चंद्रशेखर चौक येथे सामूहिक गो पूजन करून मोठे मारुती मंदिर व  श्रीराम मंदिरात आरती करून समारोप करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सर्व हिंदू बांधवाना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गौ ग्राम परिक्रमा मार्गावर महिला, लहान मुले व पुरुषांनी गोमातेचे पुष्पवृष्टी करून स्वागत व पूजन केले. यावेळी संगमनेरकरांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने सुरु केलेल्या या नविन उपक्रमाचे कौतुक करत त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS