Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली प्रतिनिधी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्तावाला नकार दिला आहे. य

राहात्यातील दुहेरी खुनाचे गुढ उकलले ; दाम्पत्याला संपवणारे तिघे जेरबंद, दोघांचा शोध सुरू
सिमेंटच्या किमती वाढणार | LokNews24
भुंकणारा कुत्रा चावत नसतो;शिवसेनेवर रामदास कदमांची जहरी टीका

नवी दिल्ली प्रतिनिधी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्तावाला नकार दिला आहे. यामागचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे नसल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याची माहिती स्वतः निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली आहे. विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. भाजपने देशभरात पक्षातील महत्वाच्या अनेक नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. ज्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. अशात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र, बराच विचार केल्यावर सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी लागणार आवश्यक एवढा पैसा नाही, त्यामुळे मी निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी पक्षाला सांगितले आहे.  जेव्हा सीतारामन यांना विचारण्यात आले की, देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा पैसे का नाही?, यावर उत्तर देतांना त्या म्हणाल्या की, भारताचा एकत्रित निधी हा माझा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे. भारताचा एकत्रित निधी माझा नाही, असे सीतारामन म्हणाल्या. 

COMMENTS