Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

नागपूर प्रतिनिधी - : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच

५६ वर्षांच्या आजीने नातवासोबत दिला दहावीचा पेपर l LOKNews24
ट्रकांची हेराफेरी करणारा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात | LOK News 24
तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्‍यांनी आर्थिक प्रगती करावी

नागपूर प्रतिनिधी – : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. जात पडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही मविआत काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याने त्यांची उमेदवारी नाकारली गेल्यास रश्मी बर्वे यांच्या पतीचे नाव वैकल्पिक उमेदवार म्हणून एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर होते. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

रामटेक हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. परंतु रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल (२७ मार्च ) संपली. त्यानंतर उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला. दरम्यान, रश्मी बर्वेंच्या एबी फाॅर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पतीचं नाव देण्यात आलं होतं. रश्मी बर्वेंचं प्रमाणपत्र रद्द झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे रामटेकमधून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

COMMENTS