Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजे लखुजीराव जाधव ऐतिहासिक कालीन राजघराण्याची साक्ष देणाऱ्या आडगावराजाची पाहणी करा- सरपंच कासाबाई कहाळे यांची खासदार सूप्रीयाताईनां मागणी

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे राष्ट्र माता जिजाऊ जन्मस्थळापासुन अवघ्या १३ कि.मी.अंतरावर असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक राजघराण्याची साक्

कापसाला यावर्षी योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी  – खा. रक्षा खडसे  
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला दुष्काळग्रस्तांशी संवाद
उध्दव ठाकरे यांनी आपल्या व्यासपिठावरील लोक तपासुन पाहिली पाहिजे – आ. प्रविण दरेकर 

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे

राष्ट्र माता जिजाऊ जन्मस्थळापासुन अवघ्या १३ कि.मी.अंतरावर असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक राजघराण्याची साक्ष देणाऱ्या आडगावराजा येथे राजे लखुजीराव जाधव यांनी बांधलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यासह १३ एकर जमिनीवर तटबंदी व भुयारी खोल्या आजही ईतिहासाची साक्ष. असून या ऐतिहासिक वास्तुची खासदार सुप्रीयाताई सुळे यांनी पाहणी करुन ऐतिहासिक ठेवा जतन करुन आडगावराजा चा जिजाऊ जन्मस्थळ आराखड्यात समावेश करुन ऐतिहासिक वास्तुचा ठेवा जतन करावा अशी मागणी आडगावराजा च्या सरपंच कासाबाई मानसिंग कहाळे यांनी केली आहे. घराण्यापैकी राजे लखुजीराव जाधव (सिंदखेड राजा) हे एक कर्तबगार , महापराक्रमी राजे होते.


राजे लखुजीराव जाधव यांच्या राजघराण्यातील जहागिरीचे आडगाव राजा,गांव आहे. ऐतिहासिक साक्ष देणारे व राज घराण्याचे वैभव सांगणारे आडगाव राजा हे गाव राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मभुमीचे शहर सिंदखेडराजा येथुन १२ कि.मी.अंतरावर असणारे व डोंगरावर वसलेले हे दिमाखदार गाव .गावात प्रवेश करण्यापुर्वीच दुरूणच दिसणारा ईतिहासाची साक्ष देणारा , नकळत आपल्याला ईतिहासाची आठवण करुण देणारा , दिमाखात ऊभा असलेला डोलदार किला नजरेस पडतो.किल्याच्या चोहो बाजुने असलेले भक्कम बुरूज किल्याची तटबंदी त्याकाळी शञु च्या आक्रमणापासुन संरक्षण करण्यास किती मजबुत होता हे आजही पाहताक्षणी निदर्शनास येते.


किल्यामधे प्रवेश करण्यासाठी एकच मुख्य दरवाजा , किल्यामधे प्रवेश करता येणार नाही यासाठी किल्याच्या चोहोबाजुने ऊंच आणी मजबुत बांधलेली अप्रतिम भिंत जागोजागी असलेले बुरूज (परकोट) जेणेकरुन प्रत्येक बुरूजावरूण शञुवर तोफेचा मारा करता यावा या दृष्टीने बुरूज बांधलेले .
आडगावराजा येथिल किल्यामधुन सिंदखेड राजा येथिल जिजाऊ जन्मस्थळावरील राजवाडा येथे जाणारा भुयारी मार्ग हे या किल्याचे वैशिष्ट्ये होय.त्याचप्रमाणे किल्याच्या आतमधे भुईकोट खोल्या (विस्तीर्ण ) भुईकोट खोल्या किल्यासमोरील बुरूजासमोरील बुरूजामधे आहे.सर्व ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत.ऊजेड येण्यासाठी जागोजागी झरोके आहेत.किल्याच्या दक्षिणेस १५०फुट खोल दगडी बांधकाम केलीली पुरातन विहीर असुन या विहीरीमधे ऊतरण्यासाठी पायऱ्या आहेत.या विहीरी चे वैशिष्ट्ये म्हणजे विहीरीचे तळ जमिनीबरोबर असुन देखील त्या विहीरीला पाणी आहे.


याच किल्ला परीसरामधे पंचधातुच्या ७ तोफा १९९० च्या दरम्यान सापडल्या असल्यामुळे हे ठिकाण शस्त्र सामुग्री चे होते या वरून दीसुन येते.या तोफा आजही पर्यटकाना पाहण्यासाठी जिजाऊ राजवाडा सिंदखेड राजा येथे ऊपलब्ध आहेत.राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजाची सर्व घरे ही किल्ला परीसरात वास्तव्यास आहेत.
किल्याच्या डाव्या बाजूस (ऊतर) शिवकालीन तलाव आहे .या प्रेक्षणीय तलावामधे कायमस्वरूपी पाणीसाठा असण्यासोबतच कमळाचे विलोभणीय फुले आहेत. तलावातील जर पाणी साठा ऊपलब्ध असला तर गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही .म्हणून च त्या काळात राजे लखुजीराव जाधवानी गावाला टंचाई भासु नये यासाठीच तलावाची निर्मिती केले आहे.शासनाने या तलावातील जर गाळ काढुन खोलीकरुन करुन पाण्याचा स्ञोत वाढविला आणी तलाव जर भरला तर पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाणी टंचाई कधीच भासणार नाही .ईतिहासकालीन किल्यांचे, तलावाचे शासनाने सुशोभिकरण व सौंदर्यकरण केल्यास हे एक पर्यटनास योग्य ठिकाण ठरेल .आडगावराजा गावामधे तलावाच्या दक्षिणेस रेणुकादेवी हेमाडपंथी पुरातन मंदिर आहे.मंदिरामधे रेणुकादेवीमातेचा भव्य मुखवटा आहे.नवसाला पावणारी देवी म्हणून आजही लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन मोठ्या श्रद्धेने , भक्ती भावाने येथे दर्शनास , नवस फेडण्यास वर्षभर येतात.येथे नवराञोत्सवामधे ९दिवस कार्यक्रम होतात.व दहाव्या दिवसी होमहवन ,यज्ञ,ईत्यादी सह साधुसंताच्या पुजेचे कार्यक्रम होतात.तसेच चैञसुद्ध पोर्णीमेला मोठी याञा भरते याञेमधे याञेमधे विवीध नवस १२ गाड्या ओढणे,देवीची मिरवणूकासह वाघ्यामुरळीचे कार्यक्रम , देवीची राञ साजरी करणे, ईत्यादी कार्यक्रम साजरे होतात.यात भाविकांच ऊदंड प्रतिसाद लाभतो अशा प्रकारे ऐतिहासिक आडगावाराजा ची ओळख असुन पर्यटक येण्यासाठी चा हा ऊतम नमुना असताना सुद्धा शासनाने या गावाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे या ऐतिहासिक वास्तु नष्ट झाल्याशीवाय राहणारा नाही .त्यासाठी आपण य ऐतिहासिक वास्तुची पाहणी करुन या ऐतिहासिक वास्तुचा जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखड्यात समावेश करुन जतन व सर्वधन करावे असी मागणी आडगावराजा च्या सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी केली आहे.

COMMENTS