Homeताज्या बातम्या

राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; कोकण, घाटमाथा आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता

पुणे: राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबई तसेच मराठवाड्यातील काह

राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुणे-सातारा  घाटमाथ्यावर अतिवृष्टी, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट | Maharashtra Heavy  Rain Alert ...

पुणे: राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबई तसेच मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांसाठी पुढील १२ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा देत मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी तसेच घाटमाथ्याच्या परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण पट्ट्यासाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणांमध्येही पाण्याची आवक वेगाने वाढत असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंदावली असून दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे.

जायकवाडी धरणाचा जलसाठा ५३ टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात प्रतिफॉक्स सुमारे १३ लाख ४२ हजार लीटर पाणी दाखल होत असून गेल्या चार दिवसांत जलसाठ्यात मोठी भर पडली आहे. २२ जुलै रोजी सुमारे ३१ टक्के असलेला उपयुक्त जलसाठा आता ५३.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा १,१४४.९०४ दलघमी, तर एकूण जलसाठा १,८८३.०१० दलघमी इतका झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त जलसाठा ७९.२५ टक्के होता. यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाला असला तरी धरण निम्म्याहून अधिक भरल्याने मराठवाड्यातील पिण्याचे पाणी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS