Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना

ठाणे : टिटवाळा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी पती सती

उल्हासनगरमध्ये महिलांची अमानुष धिंड; केस कापून, चपलांचा हार घालून अर्धनग्न अवस्थेत फिरवले
पोटच्या मुलाला आईने चटके देत केली मारहाण
कल्याणमध्ये कुख्यात गुंड पोलिसांच्या ताब्यात
Palghar Crime News: Man Kills Wife In Tarapur Over Character Suspicion |  पालघर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

ठाणे : टिटवाळा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी पती सतीश वाघे याला अटक केली आहे.

सतीश वाघे आणि त्याची पत्नी सारिका उर्फ रुक्सार वाघे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. रविवारी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात सतीश वाघे याने घरातील हंड्याने पत्नीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.

या हल्ल्यात सारिका उर्फ रुक्सार वाघे गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी घटनेची नोंद करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS