चोरटा पकडण्याचा सिनेस्टाईल थरार ; अंगलट…तिघांविरुद्ध गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरटा पकडण्याचा सिनेस्टाईल थरार ; अंगलट…तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील कायनेटीक चौकात असलेल्या रविश कॉलनीत बुधवारी (20 एप्रिल) सकाळी सोन्याची चेन चोरणारा चोरटा पकडण्यासाठी सिनेस

ब्राह्मणगावात रंगले सरपंच चषकाचा सामने
पाचशेवर कामगारांची झाली एचआयव्ही तपासणी; अमृतदीप प्रकल्पात स्थलांतरीतांना आरोग्य मार्गदर्शन
राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर महिलाराज

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील कायनेटीक चौकात असलेल्या रविश कॉलनीत बुधवारी (20 एप्रिल) सकाळी सोन्याची चेन चोरणारा चोरटा पकडण्यासाठी सिनेस्टाईल थरार रंगला, पण तो परिसरातील तिघांच्या अंगलट आला. चोरट्याला पकडल्यावर त्याला बेदम मारहाण केल्याने त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अर्थात त्या चोरट्याविरुद्धही सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घरात घुसून महिलेच्या गळ्यातील चेन चोरणार्‍या चोरास पळत जाऊन नागरिकांनी पकडले व बेदम मारहाण केली. व्हीआरडीई चौकातील रविश कॉलनीमधील रहिवासी सुरेखा पेगडवार या घरात झोपलेल्या असताना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरात घुसलेल्या व्यक्तीने पेगडवार यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून घेत पळ काढला. पेगडवार यांनी लगेच बाहेर येत आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे नागरिक बाहेर आले. त्यातील काहींनी पळत जाऊन पाठलाग करीत रिक्षातून पळून जाण्याच्या प्रयत्नातील चोरास ईलाक्षी शोरूम जवळ पकडले. त्याच्याकडे चोरलेली चेन असल्याचे कळताच नागरिकांनी त्यास चांगलेच चोपले. कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचार्‍यांनी पेगडवार यांच्या फिर्यादीवरून या सोमनाथ रंगनाथ आडागळे (वय 32, रा. भूषणनगर, केडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास मुद्देमालासह अटक केली. दरम्यान, परिसरातील चर्चेनुसार ा पेगडवार यांच्या घरावर त्याने पाळत ठेवली होती व दोन दिवसापूर्वी घर भाड्याने देता का याची चौकशी करून तो गेला होता. बुधवारी सकाळी बंधन फायनान्स कंपनीच्या कर्जाचा हप्ता घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत त्याने चोरीचा प्रयत्न केला. त्याच्याकडे बंधन फायनान्स कंपनीच्या कर्जदारांची यादीही होती, असे समजते.

तिघांविरुद्ध गुन्हा
पोलिसांनी पकडलेल्या आडागळे यानेही पोलिसात फिर्याद दिली आहे. बंधन बँकेच्या वसुलीसाठी गेलो असता थकबाकीदार रुपाली घोलप यांच्याबाबत चौकशी केल्यावर पेगडवार यांनी आरडाओरड व शिवीगाळ केली आणि परिसरातील तीन-चारजणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत त्याने म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी ननावरे, कांबळे व पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS