Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकणे पडले महागात

गु्रप अ‍ॅडमिनसह दोघांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा ः सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील ग्रुप अँडमिन सह अन्य दोघांवर अँट्रॉसिटी का

आ.धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
परशुराम जयंती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

देवळाली प्रवरा ः सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील ग्रुप अँडमिन सह अन्य दोघांवर अँट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. गावातील वातावरण बिघडविण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहे. तरुणांनी आक्षेपाहार्य संदेश सोशल मीडियावर टाकून गावाची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करु नये अन्यथा आमच्या मार्गाने अशा लोकांचा बंदोबस्त केला जाईल असे निषेध सभेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सांगितले.  

             देवळाली प्रवरा परिसरात सोशल मीडियावरील सकल हिंदू समाज देवळाली प्रवरा या ग्रुपवर जातीवाचक पोस्ट टाकून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे संतप्त जमावाने निषेध व्यक्त करुन  राहुरी पोलीस ठाण्यात सागर संसारे यांच्या फिर्यादीवरून डॉ. रवींद्र सुदाम भांड, अनिल पटारे, दत्तात्रय गागरे (ग्रुप अ‍ॅडमिन) या तिघांवर अ‍ॅट्रोसिटी कायदा अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी जाहिर निषेध सभेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी बोलताना सांगितले की, आपण सर्वजण हिंदु आहोत.देवळाली प्रवरात सर्व समाजाच गुण्यागोविंदाने राहत आहे.परंतू काही ठरावीक लोक कोणाच्या तरी इशार्‍यावर जातीय संदेश टाकून तेढ निर्माण करीत आहे.अशा लोकांचा आपल्याच बंदोबस्त करावा लागेल.आपण सर्वजण हिंदू आहोत. पण जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही गाव पुढार्‍यांचे चमचे काम करीत आहेत.असे थोरात यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्या नंतर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष  सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातून फेरी काढुन गुरवारी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.गुरवारी सकाळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष थोरात यांच्या कार्यालयासमोर जाहिर निषेध सभा घेण्यात आली. या सभेत कुमार भिंगारदे, पञकार रफिख शेख, अन्य कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सदर पोष्ट टाकणार्‍या तीनही आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोशल मीडियावर जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

COMMENTS