Homeताज्या बातम्या

ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात रंगणार सोहळा

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. हे

मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादी समाज आक्रमक; ३० जूनला मुंबईत विधानसभेला घालणार घेराव
‘सिंदुर’मोहिमेचा अध्याय अद्याप संपलेला नाही; गरज भासल्यास पुढील टप्प्यासाठी तिन्ही सेना सज्ज – जनरल उपेंद्र द्विवेदी
Pune University to Host 100th Marathi Sahitya Sammelan

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. हे संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या साहित्य महोत्सवाचे आयोजन भव्य आणि संस्मरणीय स्वरूपात करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला संमेलनाचे संयोजक राजेश पांडे, कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक तसेच कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते.

या संदर्भात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पुण्यात झाली. बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यापूर्वी १३ जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. तेथील उपलब्ध सुविधा, वाहतूक व्यवस्था, निवास आणि कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आवश्यक जागा यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

स्थळ निवड समितीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंग कटरे यांचा समावेश होता. समितीने विविध पर्यायांचा अभ्यास करून विद्यापीठ परिसर हा संमेलनासाठी सर्वाधिक योग्य असल्याचा निष्कर्ष नोंदवला आणि त्यानुसार या ऐतिहासिक १०० व्या संमेलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

COMMENTS