Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुत्रा चावल्याने मालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर प्रतिनिधी - रस्त्याने चाललेल्या एका महिलेवर पाळीव कुत्र्याने हल्ला करुन चावा घेऊन तिला जखमी केल्याने या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल

विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र
सात मल्टीनिधी संस्थांनी गुंतवणूकदारांना फसवले…
शब्दगंध परिषदेचे ऑक्टोबरमध्ये साहित्य संमेलन

अहमदनगर प्रतिनिधी – रस्त्याने चाललेल्या एका महिलेवर पाळीव कुत्र्याने हल्ला करुन चावा घेऊन तिला जखमी केल्याने या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी या कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. भिंगार शहरात ही घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भिंगार शहरातील बेरड गल्लीत राहणारी एक 34 वर्षीय महिला मंगळवारी (दि. 29) रात्री 9 च्या सुमारास किराणा दुकानात रस्त्याने जात असताना बेरड गल्लीत राहणार्‍या एका कुटुंबाच्या पाळीव कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे त्या जखमी झालेल्या महिलेने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी कुत्र्याचे मालक असलेल्या एका महिलेविरुद्ध भा.दं.वि.क. 324, 289 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची जोरदार चर्चा भिंगार शहरात सुरू आहे. दरम्यान, नगर शहर व भिंगारमध्ये एकीकडे मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असताना आता पाळीव कुत्र्यांपासूनही रस्त्याने जाणार्‍या-येणारांना धोका निर्माण झाला आहे.

COMMENTS