Homeताज्या बातम्या

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्रपेढीतर्फे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त

भारतीय रेल्वेच्या जवानांनी धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती करून वाचवले दोन जीव; आरपीएफच्या ‘ऑपरेशन मातृशक्ती’चे सर्वत्र कौतुक
रुग्णसेवक अमजद खान यांना क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती मानवतावादी गौरव पुरस्कार जाहीर
पुरुषोत्तमपुरी गोदापात्रात बुडणार्‍या भाविकास वाचवले; जवानांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार


शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्रपेढीतर्फे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. नेत्रदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्या कुटुंबीयांचा गौरव करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. अजित पाटील, डॉ. सौदामिनी निघुते, डॉ. अनघा विखे, अधिसेविका नजमा सय्यद यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नेत्रदात्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
प्रास्ताविकात नेत्रपेढी प्रमुख डॉ. अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्त्व, त्यासंदर्भातील गैरसमज आणि जनजागृतीची गरज याविषयी माहिती दिली. गेल्या वर्षभरात श्री साईनाथ नेत्रपेढीत नेत्रदान केलेल्या २६ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मानित कुटुंबीयांनी मनोगत व्यक्त करत नेत्रदानामुळे इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात गोरक्ष गाडीलकर यांनी नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. संस्थान रुग्णालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यसेवा व नेत्रदान जनजागृती उपक्रमांची माहिती देत त्यांनी नेत्रदान करणाऱ्या कुटुंबीयांचे आभार मानले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांनी मानले.

COMMENTS