Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून

बेलापूर/प्रतिनिधी ः बेलापूर उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात रस्त्याच्या कडेला असणार्‍या नईम पठाण यांच्या बंगल्यावर रात्री दरोडा पडला असून दरोडेखोरा

सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या
अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून वृत्तपत्र वितरकांना मदतीचा हात.
तुळजाभवानी देवीचा पलंगाच्या प्रवासाला परवानगी मिळावी, भाविकांची मागणी

बेलापूर/प्रतिनिधी ः बेलापूर उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात रस्त्याच्या कडेला असणार्‍या नईम पठाण यांच्या बंगल्यावर रात्री दरोडा पडला असून दरोडेखोरांनी खिडकीला असणार्‍या पडद्याने गळा आवळून नईम पठाण याचा खून केला असून त्यांची पत्नी बुशराबी पठाण या गंभीर जखमी आहेत. 

या बाबत समजलेली हकीकत अशी की नईम पठाण हे व्यावसायीक असून एकलहरे शिवारात बेलापूर उक्कलगाव रस्त्यालगतच त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यात नईम त्याची पत्नी बुशराबी हे दोन मुलासह राहात होते. रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान चार दरोडेखोर पाठीमागील दरवाजातुन घरात शिरले त्यात एक महीलाही होती. त्या वेळी नईम पठाण याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी खिडकीला असणार्‍या परद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला त्यातच त्याचा मृत्यू झाला. पत्नी बुशराबी हिलाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली. त्याही गंभीर जखमी झाल्या. घरातील पाच ते सहा लाख रुपयाची रोकड घेवून दरोडेखोर पसार झाले. बुशराबी पठाण या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी वडील अनवर जहागीरदार यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. एकलहरे गावचे सरपंच रीजवाना अनिस जहागीरदार यांचे पती अनिस जहागीरदार व अनवर जहागीरदार हे तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी नईम पठाण वय 40 वर्ष हा मयत झालेला आढळला. तसेच बुशराबी यागंभीर जखमी झालेल्या होत्या. त्यांना तातडीने साखर कामगार हाँस्पीटल येथे हलविण्यात आले.
अनिस जहागीरदार यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश देवुन सर्वांना जागृत केले. या बाबत बेलापूर पोलिसांना माहिती समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलिस अधीकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पीएसआय सुरेखा देवरे हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. अहमदनगर गुन्हा अन्वेषणची टीम देखील गावात दाखल झाली. ठसे तज्ज्ञ तसेच श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्‍वान बंगल्याभोवतीच घुटमळले.

खून केल्यामुळे दरोडा की घातपात – बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे आरोपी लवकर हाती लागण्याची दाट शक्यता असून घटनेच्या कालावधीत एक स्वीप्ट कार या रस्त्याने गेल्याचे आढळून आले असून अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी बेलापूर पोलिस स्टेशनचे पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. दरोडेखोरांनी नईम पठाण यांचा गळा आवळून खून केल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. हा दरोडा आहे की अन्य काही या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे.

COMMENTS