Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; महिलांवर्गात धनश्री सुजय विखेंचा बोलबाला

अहमदनगर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा

खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक
आमदार असताना शेतकर्‍यांचे किती प्रश्‍न विधानसभेत मांडले
पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्‍वमेध कुणी रोखू शकणार नाही

अहमदनगर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. राहुरीत आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा. सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्‍चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत. विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला,युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.
शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान करण्यात आला. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शशिकलाताई पाटील, शेती व व्यवसाय क्षेत्रातील पुष्पलताताई येवले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दिपा कुसळकर, 32 वर्षांपासून ईश्‍वरीय सेवेत असणार्‍या ब्रह्मशांती पद्मादेवी, कृषी क्षेत्रातील कविता जाधव, वैद्यकीय क्षेत्रातील श्रीम. डॉ. केतन साळवे, अध्यात्मिक कार्य करणार्‍या ह.भ.प. वंदना आंधळे, क्रीडा व कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या ज्योती खेडेकर/ धामोरे, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील ज्योती शिंदे, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील सोनाली बर्डे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मगर, फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या काजल शर्मा, बालक संगोपन सेवा क्षेत्रातील सखुबाई जाधव, उद्योजिका रोहिणी कुसमुडे, बचत गट संघटन करणार्‍या उमा जैन, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या वंदना कांडेकर, बचत गट क्षेत्रात कार्य करणार्‍या वैशाली धसाळ, अध्यात्मिक कार्य करणार्‍या ह.भ.प. सोनालीताई गावडे/ तागड, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

विखे आणि कर्डिलेंनी धरला ठेका…- आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खा.सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलेच. आपल्या अवखळ स्वभावामुळे अवधूत गुप्ते कार्यक्रमात मोठी रंगत आणतात. अरे दिवानो, मुझे पाहचानो..  में हु डॉन.. या गाण्यावर खा.सुजय विखे चांगलेच नाचले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खा.विखे आणि माजीमंत्री कर्डीले यांनी खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डीले आणि विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.

COMMENTS