Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर चार दिवसानंतर प्रशासनास आली जाग

मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे

श्रीगोंदा शहर ः लेंडी नाला सुशोभीकरणाच्या कामांत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात 4 मार्च रोजी गणेश घोडके यांनी श्रीगोंदा नगर पालिका प्रशासन

प्रदीप मकासरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल
बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला

श्रीगोंदा शहर ः लेंडी नाला सुशोभीकरणाच्या कामांत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात 4 मार्च रोजी गणेश घोडके यांनी श्रीगोंदा नगर पालिका प्रशासनाच्या दारात सुरु केलेले आमरण उपोषण गुरूवारी संध्याकाळी 5:00 वाजनेच्या सुमारास तात्पुरते स्थगित करण्यात आले.
लेंडी नाला सुशोभिकरनाच्या कामांत चाललेला अनागोंदी कारभार मुळे नाल्यातील चेंबरमध्ये गणेश बाळासाहेब घोडके यांची म्हैस पडून मृत्यू झाल्यानंतर पिडित व्यक्तिसह वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया पँथर सेना पदाधिकार्‍यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पिडीताची म्हैस नाल्यातील चेंबरमध्ये पडल्यानंतर ठेकेदार वैभव माने यांनी तिचा वैद्यकीय पंचनामा न करता मयत जनावर पुरून टाकल्याचे समोर आले होते. पिडीताने पुरोगामी संघटनांच्या मदतीने नमुद ठेकेदार माने हे या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत दुर्घटनेस जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात व नगरपालिकेत तक्रारी अर्ज सादर केला. मात्र, पाठपुरावा करून गणेश घोडके यांच्या नुकसानभरपाईसाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक प्रशासन घोडकेंच्या विरोधात भुमिका मांडत असल्याने संघटनांच्या माध्यमांतून 4 मार्च रोजी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. व आंदोलन चालु करण्यात आले. सलग चार दिवस चाललेल्या आंदोलनात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी सपशेल दुर्लक्ष करीत आंदोलन स्थळी येण्याची तयारी दाखवली नाही. संतप्त आंदोलकांनी आंदोलनाची तीव्रता वाढवत ढोलताशा वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तरीही, पालिका प्रशासनाच्या वतीने कोणतेही ठोस आश्‍वासन घोडकेंना मिळाले नाही. अखेर गुरूवारी काही सामाजिक, राजकीय पदाधिकार्‍यांनी साधलेल्या समन्वयानंतर आंदोलन स्थळी मुख्याधिकारी  श्रीमती भगत, व त्यांचे प्रशासकिय अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत पिडित गणेश घोडके व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भगत यांनी आंदोलनातील सर्व मागण्याची पूर्तता करण्याबाबत लेखी आश्‍वासन दिले. तपास झाल्यानंतर घोडके यांना प्रशासन नुकसानभरपाई देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS