संगमनेर शहरात त्या ठिकाणी दुषित  जलशुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा  विरोध

HomeअहमदनगरUncategorized

संगमनेर शहरात त्या ठिकाणी दुषित जलशुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध

संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात असलेल्या यंग नॅशनल मैदान याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या दुषित जल शुद्धीकरण संयंत्र (एसटिपी प्लां

संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला
Sangamner : शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणतात… मी कधी रेशनचे धान्य घेतलेले नाही…

संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात असलेल्या यंग नॅशनल मैदान याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या दुषित जल शुद्धीकरण संयंत्र (एसटिपी प्लांट) ला परिसरातील स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून याबाबत नगरपालिकेला निवेदनही देण्यात आले आहे. आज मंगळवार दि. ७ रोजी सकाळी नऊ वाजता नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी काम चालू करण्यासाठी आले असता त्या वेळी स्थानिक नागरिक एकत्र येत या कामाला विरोध केला. यावेळी स्थानिक नागरिक व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये काही वेळ सौम्य वादही झाले. संगमनेर नगरपिषदेकडून याठिकाणी उभारणी होत असलेल्या दुषित जल शुद्धीकरण संयंत्र (एसटिपी प्लांट) मुळे येथील नागरिकांना भविष्यात त्याचा त्रास होणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जोर्वे नाका भागातील यंग नॅशनल मैदानाची जागा हि स्थानिक रहिवाशांसाठी उपयोगात यावी असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी नगरपरिषदेने सुसज्ज बाग व खेळाचे मैदान उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगरपरिषदेने संबंधित दुषित जल शुद्धीकरण संयंत्र दुसर्या जागेवर न्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा पवित्र घेण्यात येणारे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवाशी व प्रशासकिय अधिकार्यांत वाद मिटविण्यासाठी येथील नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्ती केली. त्यानंतर अखेर नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणाहून निघून गेले.

COMMENTS