Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मा.खा. डॉ. सुनील गायकवाड यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित भव्य सोहळ्यात यंदाचा लिजेंड दादासाहेब

राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा : आ. दानवेंची मागणी
निर्माते आर. बी. चौधरी काळाच्या पडद्याआड; उदयपूरमध्ये कारचा भीषण अपघातात मृत्यू
एकाच दिवशी 2 दिग्गज कलाकारांचा अपघाती अंत निर्माते आर. बी. चौधरी आणि अभिनेते संतोष नायर यांचे निधन

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित भव्य सोहळ्यात यंदाचा लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार 2026 लातूरचे लोकप्रिय माजी खासदार, संसदरत्न, प्राध्यापक, विधिज्ञ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
मुंबईतील रहेजा क्लासिक क्लब येथे डॉ कृष्णा चौहाण फाउंडेशनच्या वतीने हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भजनसम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी राजकारण, शिक्षण, समाजकार्य यांसह चित्रपट क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. लातूरचे माजी खासदार आणि फिल्म सेन्सर बोर्डाचे माजी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय, चित्रपट निर्माते व अभिनेते म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्यांनी हिंदी चित्रपट आझाद भारत च्या सहनिर्मात्याच्या भूमिकेतून चित्रपट निर्मिती क्षेत्रात नवी इनिंग सुरू केली असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला विनोदी अभिनेते सुनील पाल, उद्योगपती आदित्य सिंघानिया, तसेच आयोजक डॉ कृष्णा चौहाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे आणि मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत यामुळे वातावरण भारावून गेले होते. डॉ. गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध क्षेत्रांना प्रेरणा मिळत असून, आगामी काळातही ते चित्रपट व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देतील, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS