Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनीषा हवालदारला सहा दिवसांची सीबीआय कोठडी; नीट पेपरफुटी प्रकरणात कारवाई

पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या 'नीट' (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. केंद्रीय अन्वेषण व

विद्वान ज्ञानाने समाजाला दिशा देतात-प्रसाद महाराज काष्टे‘नीतीशतक’ संगीतमय कथेतून प्रबोधन; नीट पेपरफुटी प्रकरणावरही भाष्य
NEET पेपरफुटीतून कोट्यवधींची कमाई; मनीषा मांधरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत होती सहभागी; लातूरचा प्राध्यापकही रडारवर
दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन हिंसक; पोलिसांवर हल्ला, इंटरनेट सेवा बंद, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चाचा प्रयत्न
मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमधील 'गॉड' नावाचा क्रमांक विद्यार्थ्याचा,  फॉरेन्सिक तपासातून माहिती उघड, | Saamana (सामना)

पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट’ (NEET) प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केलेली भौतिकशास्त्र (Physics) विषयाची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिला न्यायालयाने सोमवारी सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तिच्या चौकशीतून प्रश्नपत्रिका गळतीच्या जाळ्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली असली, तरी मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच असल्याचे दिसून येत आहे.

तपासादरम्यान मनीषा हवालदारच्या पतीच्या भ्रमणध्वनीमध्ये (Mobile) ‘गॉड’ (God) नावाने जतन केलेला क्रमांक हा तेजस शहा नावाच्या विद्यार्थ्याचा असल्याचे न्यायवैद्यकीय (Forensic) तपासातून स्पष्ट झाले आहे. या क्रमांकाद्वारे प्रश्नपत्रिका पुरवठा आणि पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयात हवालदार हिला हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने तिला सहा दिवस केंद्रीय कोठडी सुनावली. या काळात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दोन ग्रुप तयार करून उकळले लाखो रुपये या घोटाळ्यात संदेशवहन माध्यमाचा (Social Media/WhatsApp) वापर करून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे. ‘गळती झालेली प्रश्नपत्रिका’ आणि ‘शंभर टक्के यश’ अशा नावांचे ग्रुप (Group) तयार करून विद्यार्थ्यांकडून सुरुवातीला अल्प रक्कम घेण्यात येत होती. त्यानंतर मूळ प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळण्यात आल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS