Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेतील शिक्षण व सिंचनाचा प्रश्‍न प्रलंबितच ः पांडे

अकोले ः अकोले तालुक्यात सध्या विकासाचे नावाखाली शासनाकडून कोट्यावधी रुपयांची उधळण होत आहे. परंतु सिंचन व शिक्षण या दोन्ही महत्वाच्या प्रश्‍नासह इ

महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर -संतोष माणकेश्‍वर
द सेवा मंडळाच्या सेवक प्रतिनिधी निवडणुकीत प्रगती पॅनलची बाजी
Ahmednagar : नगर – कल्याण महामार्गाचे काम सुरु…खा.विखे – आ .जगताप यांनी केली पाहणी | LokNews24

अकोले ः अकोले तालुक्यात सध्या विकासाचे नावाखाली शासनाकडून कोट्यावधी रुपयांची उधळण होत आहे. परंतु सिंचन व शिक्षण या दोन्ही महत्वाच्या प्रश्‍नासह इतर प्रश्‍नाबाबत अलीकडच्या काळात काय काम झाले, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी केला आहे.
पांडे पुढे म्हणाले की, नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली का, रोजगार निर्मिती, शेतमालाचे व दुधाचे भाव वाढले का, यावर कोणी बोलत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर गेली कैक वर्षे प्रशासक राज असल्यामुळे तिथल्या कामावर ही कोणाचे लक्ष नाही. सुमारे दहा वर्षांपूर्वी मंजूर असलेली  निळवंडे धरणातून अकोले व  32 गाव पिण्याच्या पाण्याची योजना अद्याप पर्यंत पूर्णत्वास गेली नाही. पेय जल योजनाचा फक्त गाजावाजा होत आहे. प्रत्यक्षात किती योजना पूर्ण होऊन लोकांना शुद्ध पाणी मिळते. अकोले येथील तहसील कार्यालयाचे काम कित्येक वर्षांपासून रेंगाळले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर रंग रंगोटी चालू आहे. तालुक्यासाठी क्रीडा संकुल मंजूर झाले होते. ते कधी पूर्ण होणार? अकोले शहरात कित्येक शासकीय जागा असूनही अकोले शहरात गार्डन नाही, पार्किंगला जागा नाही. प्राथमिक शिक्षण व आश्रमशाळा यांची अवस्था वाईट आहे. शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. सिंचनाचा व विज बोर्डाचा कोणताच मोठा प्रकल्प मार्गी लागला नाही. लोकप्रतिनिधिंच्या विकासाच्या व्याख्येत ही कामे बसत नाही का? निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांची चाचणी झाली. पाणी गळती मुळे पिकांचे व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई अद्यापर्यंत मिळालेली नाही. पावसाळ्याच्या आत कालव्याच्या  दुरुस्तीचे व अस्तरीकरणाचे कामे होणे गरजेचे असल्याचे पांडे म्हणाले आहेत.

COMMENTS