Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता, मात्र सप्टेंबरच्या मध्यावधी पुन्हा एकदा जोरदार पावस

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह ठाण्यात पावसाचा धुमाकूळ
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता, मात्र सप्टेंबरच्या मध्यावधी पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गणेशोत्सव काळात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही. लवकरच राज्यातून पाऊसही निरोप घेणार असून त्याआधी धो- धो कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम संपला आहे. त्यामुळे आता आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात राज्यात परतलेला पाऊसही लवकरच निरोप घेणार असून त्याआधी तो- धो धो कोसळणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. पुढील 48 तासात राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 3 तारखेनंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

COMMENTS