Homeताज्या बातम्यादेश

राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक

नवी दिल्ली: राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्र काँगे्रसमध्ये राजकीय भूकंप होणार असून, अनेक आमदार भाजपसोबत येणार

Jalna : पिंजारी समाज बांधवांची संघटन बैठक (Video)
लोणंदच्या कु. पायल जाधव हिला कराड येथे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
Nanded : जिल्हापरिषद शाळेमध्ये चालतो मटका व दारूचा व्यवसाय (Video)

नवी दिल्ली: राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्र काँगे्रसमध्ये राजकीय भूकंप होणार असून, अनेक आमदार भाजपसोबत येणार असल्याचा दावा राज्य सरकारमधील मंत्र्यांनी केलेला आहे. त्यामुळे काँगे्रसमध्ये उभी फूट पडणार का असा सवाल उपस्थित होत असतांना, काँगे्रसने सावध पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यासोबतच राज्यातील आगामी निवडणुकांची तयारी करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर आज दिल्लीत राज्यातील काँगे्रस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनिती निश्‍चित करण्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. खरगे राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या बैठका घेत असून 11 जुलै रोजी महाराष्ट्रासंदर्भातील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, माणिकराव ठाकरे अशा सुमारे 15 वरिष्ठ नेत्यांना दिल्लीला येण्यास सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भात प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित चर्चाही झाली असून त्यावर मंगळवारी होणार्‍या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर काँग्रेसकडून अधिकृतपणे विरोधीपक्ष नेतेपदाची मागणी केली जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसमध्येही फूट पडण्याच्या शक्यता वर्तवली जात असल्याने राज्यातील काँग्रेस एकसंध ठेवण्यासंदर्भात महत्त्वाची पावले उचलली जाऊ शकतात. वर्षभराच्या कालावधीत शिवसेना व आता राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याने त्याची काँग्रेसमध्ये पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व घेत आहे.  राज्यात महाविकास आघाडी कायम राहणार असल्याने काँग्रेसला अधिक मोठी संधी मिळू शकते. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा सर्वाधिक स्थिर पक्ष असून भाजपविरोधात अधिक आक्रमक धोरण अवलंबले जाऊ शकते. त्या दृष्टीनेही बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

COMMENTS