Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात यंदा उशीरा मान्सून दाखल झाला असला तरी, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला, परिणामी अनेक भागात

पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णवाहिकेत अडकला मृतदेह.
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर
राज्यात उद्यापासून जोरदार पाऊस

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात यंदा उशीरा मान्सून दाखल झाला असला तरी, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला, परिणामी अनेक भागात साचले, वाहतूक कोंडीसारख्या अनेक समस्या उद्भवल्या, अनेकांच्या घरात पाणी शिरले. याच पार्श्‍वभूमीवर हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता दर्शवली आहे.
तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तर, काही जिल्ह्यांना येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांना यलो अर्लट देण्यात आला आहे. तर, पुणे, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. यातच हवामान विभागाने पुन्हा एकदा मुंबईकरांना धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबईत पुढील 24 तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबईत शनिवारी फारसा पाऊस पडला नाही. सकाळी 8.30 ते सायं. 5.30 पर्यंत कुलाबा येथे 6.8 आणि सांताक्रूझ येथे 5.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईत शनिवारच्या तुलनेत शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सांताक्रूझ येथे 110.8 मिलीमीटर आणि कुलाबा येथे 45.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती.

COMMENTS