पुण्यात ओमायक्रॉन विषाणूचा समूह संसर्ग नसल्याचे स्पष्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात ओमायक्रॉन विषाणूचा समूह संसर्ग नसल्याचे स्पष्ट

पुणे : पुण्यातील १४०० पैकी ९०९ करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे 'जीनोम सिक्वेन्सिंग' करण्यात आले. पुण्यात अद्याप ओमायक्रॉन विषाणूचा स्थानिक भाग

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात
वसईत एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न फसला
लिफ्ट कोसळून चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पुण्यातील १४०० पैकी ९०९ करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले. पुण्यात अद्याप ओमायक्रॉन विषाणूचा स्थानिक भागात समूह संसर्ग झाला नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत; तर पुण्यात डेल्टा आणि त्याच्या प्रकारातील विषाणूचा संसर्ग असल्याचेही निदान झाले आहे.पुण्यातील करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या चाचणीचे नमुने घेण्यात आले.
त्या १४०० पैकी ९०९ जणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यात पुण्यात अद्याप कोठेही ओमायक्रॉन विषाणूचा समूह संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. उलट या चाचण्यांमध्ये पुण्यात डेल्टा आणि त्याच्या काही प्रकारांच्या विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे निदान झाले आहे, अशी माहिती बी. जे. मेडिकल कॉलेज सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली .
प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर), राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) या तीन प्रयोगशाळांमधून करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या चाचण्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी पाठविण्यात आले. त्या तीन प्रयोगशाळांमधून १४०० पैकी ९०९ चाचण्यांचे नमुन्यांचे सिक्वेन्सिंग करण्यात आले. उर्वरित ४९१ नमुन्यांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. ‘आयसर’ने सर्वाधिक ७६४ तर; ‘एनसीसीएस’ने १३९ आणि ‘एनआयव्ही’ने सहा नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले आहे,’ अशी माहिती बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

COMMENTS