Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकारच्या फसव्या घोषणा

खासदार शरद पवारांचा हल्लाबोल राज्य सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँगे्रसचे दोन दिवसीय कार्यकर्ता मेळावा शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मो

संजय राऊतांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट.
राजधानीत प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांची भेट
…तर, लोक म्हणतात तो देवेंद्रवासी झाला  

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँगे्रसचे दोन दिवसीय कार्यकर्ता मेळावा शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका करतांना, मोदी सरकार अर्थव्यवस्थेबाबत फसव्या घोषणा करत असून, गँरंटी-गॅरंटी म्हणजे मोदींची आहे तरी काय? 400 जागांवर भाजपचा विजय होईल, असे सांगितले जात असून, भाजपकडून दिशाभूल करण्यात येत असल्याची टीका पवार यांनी केली.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना पवार म्हणाले की, देशातील परिस्थिती वेगळी आहे. विशेषतः महाराष्ट्रातील राज्यकर्ते मराठा समाजाला खोटी आश्‍वासन देत आहेत, त्यांची फसवणूक करत आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. मोदींनी आश्‍वासन दिले, या देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींच्या पुढे नेऊ. पण परिस्थिती वेगळी आहे. या देशाचा शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊसामुळे शेतीचे नुकसान झाले. शेतींवर माणसांची संख्या वाढली. 70 ते 80 टक्के लोक शेतीवर होते. पण आता लोकसंख्या वाढली आहे. दुसरीकडे विकासासाठी शेतीची जमीन काढून घेणे. त्यावेळी जमीनेचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अवस्था चिंताग्रस्त झाली आहे. शेतीसाठी, शेतकर्‍यांसाठी योजना आखल्या पाहिजे, अशी मागणी केली जाते. पण त्यासाठी केंद्रसरकार पुढाकार घेत नाही. त्यांचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र साखर निर्मितीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. साखर निर्यात झाली पाहिजे, पण निर्यात करायला सरकार निर्बंध वाढला आहे. अलीकडच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्याच्या संख्या दुपटीने वाढली आहे. ही बाब चिंताग्रस्त बनली आहे. दिवसेंदिवस देशात बेरोजगारीचा प्रश्‍न वाढतोय. महागाईचा प्रश्‍न मोठा झालेला आहे. गँस देशातली तरुण पिढी अस्वस्थ झाली आहे, असे शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करताना अन्य ओबीसीच्या घटकातील लोकांवर अन्याय नको, अशी मागणी आहे. दरम्यान, ही मागणी करणार्‍यांना आश्‍वासन दिलं. माझी जरांगेंशी भेट झाली. राज्यसरकारने लिखीत स्वरुपामध्ये मंजूर केली. पण ती सरकार आता पूर्ण करत नाही. त्यामुळे तरुण मुलांना आपली फसवणूक झाली असे वाटायला लागली आहे. त्याचे कारण म्हणजे, एकीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, मराठा आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहो असे म्हणतात. तर दुसरीकडे भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात एक वर्ष अजून मराठा समाजाला वाट पाहावी लागेल, असे म्हणतात. म्हणजेच सरळसरळ फसवणूक केली. तसेच 8 ते 9 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आश्‍वासन दिले होते. ते आरक्षणाचे आश्‍वासन अजूनही पूर्ण झालेली नाही. आरएसएसची विचारधारा अंगीकारली जात आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रम हातात घेतले आहे. सर्व क्षेत्रात खाजगीकरण, नफेखोरी, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय स्वायत्त संस्था ताब्यात ठेवणे. मनूवादी विचार, आक्रमक राष्ट्रवाद पाच कलमी कार्यक्रम आखला जात आहे. मणिपूरच्या घटनेने संपूर्ण देशाची मान शरमेने खाली घालावी लागत असल्याची टीका पवारांनी यावेळी केली.

वंचितला सोबत घेण्यासाठी इंडियाच्या बैठकीत मुद्दा मांडणार – मोदी सरकारकडून सत्तेचा सातत्याने गैरवापर केला जात आहे, मोदींना सत्तेपासून हटवणे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची राहिली आहे. त्यामुळे त्यांना इंडिया आघाडीत  घेण्यासाठी येणा्र्‍या बैठकीत मुद्दा मांडणार आहे. मोदींना हटविण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी देखील एकत्र काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

COMMENTS