Homeताज्या बातम्या

विषारी दारूमुळे मृतांची संख्या २२ वर; गावरान दारूमध्ये ‘मिथेनॉल’ मिसळल्याने अनेकांचा मृत्यू

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी मद्यप्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून मृतांचा आकडा आता २२ वर पोहोचला आहे. या प्रकरणात प्र

प्रशिक्षणादरम्यान पोलीस मुख्यालयात ‘हँडग्रेनेड’चा स्फोट; चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी, प्रकृती स्थिर
पाण्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला; लोहगाव शिवारातील घटनेप्रकरणी दोघांवर सोनईत गुन्हा दाखल
अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात लग्नकार्यासाठी नेलेले लाखो रुपयांचे दागिने हडप
गावठी दारूत 'मिथेनॉल' मिसळले, मृतांचा आकडा १८ वर; ५ जणांची प्रकृती अद्याप  गंभीर - Methanol Mixed in Illicit Liquor Death Toll Rises to 18 in Pimpri  Chinchwad | Webdunia Marathi

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी मद्यप्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून मृतांचा आकडा आता २२ वर पोहोचला आहे. या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, फुगेवाडी परिसरात तयार करण्यात आलेल्या गावरान (गावठी) मद्यामध्ये अत्यंत घातक रासायनिक ‘मिथेनॉल’ मिसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला. या मिश्रणामुळे मद्याचे सेवन करणाऱ्या अनेकांची प्रकृती बिघडली. काही व्यक्तींनी केवळ आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ केल्याचे समोर येत आहे.

पुण्यातील हडपसर परिसरातील पांढरेवाडी येथे आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुणे शहरातील मृतांची संख्या सात झाली असून पिंपरी-चिंचवड परिसरातील मृतांचा आकडा चौदा आहे. याशिवाय उरुळी कांचन परिसरातील एका रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या २२ वर पोहोचली आहे. उरुळी कांचन येथील ३२ वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचट यांचा मृत्यू या प्रकरणातील ताजा बळी ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी मद्यप्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना मळमळणे, रक्तदाब वाढणे, दृष्टी धुसर होणे अशा तक्रारी जाणवत होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

तब्बल २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकाऱ्यांचा समावेश असून हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व तपास पथकातील काही कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS