Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मायलेकीचा प्रवास अखेरचा ठरला; हायवेवर आयशर टेम्पो-कंटनेरला भीषण अपघात

दोघींचा जागीच मृत्यू

नाशिक प्रतिनिधी - जिल्ह्यात काल सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आईसोबत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू
आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .
Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं

नाशिक प्रतिनिधी – जिल्ह्यात काल सकाळी ७ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आईसोबत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका आडगाव मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर आयशर टेम्पो हा बंद अवस्थेत उभा होता. महामार्गावरून सकाळच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने या आयशरला टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनर चालकाच्या शेजारी बसलेल्या आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता आणि याचवेळी नाशिक शहरात प्रवेश करत असताना हा अपघात झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे. शहरात वारंवार अपघाताच्या घटना घडत असताना आता मुंबई-आग्रा महामार्गावरील या अपघाताच्या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS