बीड : दि. 3 मे 2026 रोजी होणार्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षकांच्या मानधनाबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. शहरातील एका शाळेतील मुख्या

बीड : दि. 3 मे 2026 रोजी होणार्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षकांच्या मानधनाबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. शहरातील एका शाळेतील मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक संगनमत करून पर्यवेक्षकांच्या मानधनात कपात करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार-पाच वर्षांपासून संबंधित परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांना शासनाकडून मिळणार्या 3000 रुपयांच्या मानधनाऐवजी केवळ 1000 रुपये दिले जातात. तसेच बैठकीदरम्यान देण्यात येणार्या जेवणाऐवजी फक्त चहा देऊन बोळवण केली जाते, असा गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. यंदाही अशाच प्रकारे मानधनावर डल्ला मारण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने बीड शहरात याबाबत चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे पर्यवेक्षकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास तात्काळ प्रशासनाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, तक्रारदार पर्यवेक्षकांचे नाव गोपनीय ठेवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

COMMENTS