Homeताज्या बातम्यादेश

ऑपरेशन सिंदूरवर सरकार चर्चेस तयार : मंत्री रिजिजू

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्व

स्वतः लस घ्या आणि इतरांना घेण्यासाठी प्रेरित करा : पंतप्रधान
पानवळवाडी येथे वटपौर्णिमेच्या दिवशीच विधवा प्रथेविरुध्द क्रांतीकारक निर्णय
देशामध्ये मुंबई, पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अशी विरोधकांची मागणी होती, मात्र सरकारकडून संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू अधिक माहिती देतांना म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होईल आणि ते 12 ऑगस्टपर्यंत चालेल. सरकार नियमांनुसार अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की अधिवेशनादरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडता येईल. विरोधकांच्या ’विशेष अधिवेशना’च्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे.

COMMENTS