सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार

मंत्रालयात नोकरी देतो म्हणून फसवणूकप्रकरणी सहभाग स्पष्ट

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात सहायक कक्षाधिकारी म्हणून दोन जागा रिक्त झाल्या असे सांगून श्रीरंग कुलकर्णी म्हणून एका व्य

LokNews24 : पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर फरफटत नेलंं
भाच्याच्या मदतीने मावशीने सासूचा काटा काढलाl LokNews24
ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात सहायक कक्षाधिकारी म्हणून दोन जागा रिक्त झाल्या असे सांगून श्रीरंग कुलकर्णी म्हणून एका व्यक्तीने नोकरीस लावतो, असं सांगत नेवासे तालुक्यातील भेंडा येथील तरुणाची फसवूणक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून, बनावट नोकरीचे रॅकेट संगमनेरमधे असल्याचे स्पष्ट होत असतांनाच, या प्रकरणात सैराट या चित्रपटातील प्रिन्सची भूमिका करणारा सूरज पवार याचा सहभाग समोर येत असल्यामुळे खळबळ उडाली असून, पोलिस त्याला अटक करण्याची शक्यता आहे.
या रॅकेमध्ये चक्क सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्चीचा भाऊ प्रिंन्स याच्यापर्यंत धागेदोरे पोहचले असल्याची माहिती हाती आली असून राहुरी पोलिसांनी त्याबाबत प्रचंड गोपनियता पाळली आहे. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवत नेवासा तालुक्यातील महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा) याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यातील दोन लाख रुपय दिले आणि ऑर्डर हाती आल्यानंतर तीन लाख देणे ठरले होते. वाघडकर यांना शंका आल्याने त्यांनी राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली. त्यानुसार राहुरी येथिल कृषी विद्यापीठात पोलिसांनी सापळा रचुन श्रीरंग कुलकर्णी (दत्तात्रय अरुण क्षीरसागर) यास ताब्यात घेतले. अन्य दोघे फरार झाले होते. पोलिसांनी मंत्रालयात श्रीरंग कुलकर्णी हा व्यक्ती नोकरीस आहे का, याची खाञी केली असता असा कोणताही व्यक्ती मंत्रालयात नसल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे नाव दत्तात्रय अरुण क्षीरसागर (रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यास पोलिस कोठडी मिळाली आहे. बनावट नियुक्ती पत्राबाबत आरोपी याने मौन बाळगले. परंतू क्षीरसागर शिरुर येथे ज्या भाडोञी खोटे लीत राहत होता.त्या खोली घरझडती घेतली तेथे पोलिसांच्या हाथी काहीच लागले नाही. माञ येथिल सर्व सामान आकाश विष्णु शिंदे (रा. घुलेवाडी ता.संगमनेर) याने नेल्याचे घर मालकाने सांगितल्याने संगमनेर पोलिसांच्या मदतीने आकाश शिंदे याचे घर गाठले. घरास दोन्ही बाजुने दरवाजा असल्याने तो पळूण जावू शकतो अशी शक्यता गृहीत धरुन पोलिस उप निरीक्षक सज्जन ना-हेडा पुढील बाजुने तर पो.काँ.शशिकांत वाघमारे याने मागिल दरवाजा समोर ठाकले आणि तसेच झाले दार वाजवल्या बरोबर आकाश शिंदे मागिल दरवाजाने पळूण जावू लागला होता. परंतू पो.काँ.वाघमारे याने त्याच्या मुसक्या आवळल्या शिंदे यास ताब्यात घेवून महिला पोलिसांना बोलावून घर झडती घेतली असता लँपटाँप, प्रिंटर,शिक्के ताब्यात घेतले. शिक्के कुठे बनवले याची चौकशी केली असता राहुरीचे नाव पुढे आले होते.
अधिक तपास केला असता ओमकार नंदकुमार तरटे (रा. उपासनी गल्ली, ता. संगमनेर) या तरुणाचे नाव पुढे आले त्याच्या दुकानाच्या बाजुला सापळा लावला त्यापुर्वी त्याचा राजुरी, अकोला, संगमनेर येथे शोध घेतला पण मिळाला नव्हता. आकाश दुपारी दुकान उघडण्यास आला तेव्हा त्यास झडप घालुन ताब्यात घेतले. ओमकार तरटे हा रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. त्यास न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्यातील प्रोग्रेस लक्षात घेता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिंन्स म्हणून काम केले. तो देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणार्‍यात त्याचा सहभाग असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सैराटमधील प्रिन्स याच्या तपासाबाबत मात्र पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांना कोणत्याही सुचना न मिळाल्याने तपास थंडावला आहे. हा सर्व तपास पोलिस उप निरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पो. काँ. शशिकांत वाघमारे, पो.काँ.गणेश लिपणे हे करीत आहे.

COMMENTS