सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले

Homeताज्या बातम्या

सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले

अहमदनगर/प्रतिनिधी : रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पाठीमागून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्य

कोपरगाव नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम
आ. रोहित पवार युवकांसह करणार उपोषण

अहमदनगर/प्रतिनिधी : रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पाठीमागून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी हिसकावून ओढून चोरून नेले. ही घटना नगर-बुरुडगाव रोडवरील हॉटेल वैभव जवळ, बालाजी मेडिकल स्टोअर्स समोर, चाणक्य चौक येथे घडली. संगीता नानासाहेब घनवट (वय 48 वर्षे, रा.अयोध्यानगर, केडगाव, अहमदनगर) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बुरुडगाव रोडने जात असताना चाणक्य चौकात पाठीमागून मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून चोरून नेले. मानेला हिसका बसताच घनवट यांनी आरडाओरडा केला, परंतु आजूबाजूचे लोक घटनास्थळावर पोहोचण्याआधीच मोटरसायकलस्वार पसार झाले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहे.

COMMENTS