सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास मिळणार नवीन रुग्णवाहिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास मिळणार नवीन रुग्णवाहिका

सटाणा/ तालूका प्रतिनिधी तालुक्यातील आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता सटाणा ट्रामा केअर  व आदिवासी भागातील महत्वाचे ग्रामीण रुग्णालय असलेल्या डांग

भारत जोडो यात्रा थांबवण्यास राहुल गांधींचा नकार
जैविक इंधनावर चालणारा किफायतशीर ड्रोन विकसित करावा ; केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी
शेती संस्कृतीला संजीवनी देणारे डॉ.एम.एस. स्वामीनाथन !  

सटाणा/ तालूका प्रतिनिधी

तालुक्यातील आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता सटाणा ट्रामा केअर  व आदिवासी भागातील महत्वाचे ग्रामीण रुग्णालय असलेल्या डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाच्या  आरोग्य विभागाने नवीन रुग्णवाहिका मंजुर केल्याने या भागातील जनतेच्या आरोग्य समस्या सुटण्यास मदत होणार असल्याने या भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

साक्री – शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावर महत्वाचे असलेल्या सटाणा शहरातील ट्रामा केअर सेंटर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयस रुग्णवाहिकेची गरज लक्षात घेता गेली अनेक दिवस सुसज्ज रुग्णवाहिकेची  मागणी परिसरातील जनतेकडून होत होती. याबाबत राज्यशासनाकडे व आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार चव्हाण यांनी केली होती.चव्हाण यांची मागणी लक्षात घेता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सटाणा ट्रामा केअर  सेंटर व डांगसौंदाणे या दोघा रुग्णालयांना रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णवाहिका आरोग्य विभागाने उपलबद्ध करून दिल्या आहेत  तर दुसऱ्या टप्यात लवकरच नामपुर ग्रामीण रुग्णालयास ही नवीन रूग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी संगीतले आहे.साक्री-शिर्डी या राष्ट्रीय  महामार्गावर अनेक वेळा लहान मोठे अपघात होतात यावेळी अनेक रूग्णांना पुढील उपचारासाठी मालेगाव अथवा नाशिक जिल्हा रुग्नालयात उपचारासाठी पाठविण्यात येते यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकेची गरज अत्यावश्यक असल्याने या प्रकारच्या रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास अनेक वेळा अपघातात जखमी झालेल्याना आपला जीव गमवावा लागतो मात्र या रुगवाहिकेमुळे आता रुग्णाला आरोग्य सेवा लवकर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे .तर आदिवासी भागातील व तालुक्यातील एकमेव कोव्हिडं सेंटर म्हणून अनेकांना जीवदान देणाऱ्या ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे हे आदिवाशी भागातील एकमेव महत्वाचे रुग्णालय असुन साथरोग आजार, गरोदर माता, लहान बालके, व सर्पदंश, च्या परिस्थिती मध्ये रुग्णाला कळवण उपजिल्हा रुग्णालय अथवा नाशिक जिल्हा रुग्णालयात  हलविण्यास विलंब होऊ नये म्हणून या रुग्णालयासाठी सुसज्ज रुग्णवाहिका ची मागणी गेली अनेक दिवस आदिवासी बांधवांकडुन होत होती या मुळे आता या भागातील ही समस्या सुटणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.  राज्यसरकरच्या  आदेशानुसार नाशिक विभागाला पहिल्या टप्यात आलेल्या रुग्णवाहिका मधून सटाणा ट्रामा केअर व डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णलयास या रुग्णवाहिका मिळणार आहेत यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री ना .छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांचे सहकार्य लाभले असून येत्या एक ते दोन दिवसात या रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल होतील  व याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य रूग्णांना मिळणार असल्याची माहिती माजी आमदार चव्हाण यांनी दिली आहे.

गेल्या  दोन वर्षांपासून तालुक्यातील आरोग्य यंत्रणेकडे विद्यमान लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष झाल्यामुळे  मोठया प्रमाणावर विस्कळीतपणा आला आहे.सटाणा,नामपुर,डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होते त्यामूळे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रा मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती  चव्हाण  यांनी दिली आहे.

COMMENTS