Homeताज्या बातम्यामनोरंजन

गदर 2 ने मोडले सर्व रेकॉर्ड

सनी देओल व अमीषा पटेलचा ‘गदर २’हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे . पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. ‘गदर २’च्या बॉक्स ऑ

दारू पाजून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू
मणिपूरमध्ये शस्त्र 1800 किलो अफूसह दोघे जेरबंद

सनी देओल व अमीषा पटेलचा ‘गदर २’हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे . पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. ‘गदर २’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या दोन दिवसात ‘गदर २’ ने जवळपास ८३ कोटींचा व्यवसाय केला होता. त्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी रिलीज होण्यापूर्वी ‘गदर २’ची आगाऊ बुकिंग जोरदार होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाची 7 लाखांहून अधिक तिकिटे आगाऊ बुक करण्यात आले होते. तर शनिवारी हा आकडा जवळपास 6.3 लाख होता. ‘सॅकनिल्क’ रिपोर्टनुसार, ‘गदर २’ ने रविवारी तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. ‘गदर २’ चे शो हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ४०.१ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी ४३.०८ कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांपेक्षाही जास्त कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी गदर २ ने ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १३३.१८ कोटींची कमाई केली आहे. ‘गदर २’ च्या कमाईची तुलना ‘बाहुबली’शी केल्यास सनी देओलचा चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. 22 वर्षांनंतर या सीक्वलला मोठ्या संख्येने प्रेक्षक मिळत आहेत. ‘बाहुबली २’ ने तीन दिवसांत हिंदीत केवळ ७४.४ कोटींची कमाई केली होती, तर ‘बाहुबली: द बिगिनिंग’ने तीन दिवसांत केवळ २२.३५ कोटींची कमाई केली होती. त्या तुलनेत ‘गदर २’ ची कमाई खूपच जास्त आहे. सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ने पहिल्या दिवशी १.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.२७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १.६० कोटींची कमाई केली होती. २२ वर्षांपूर्वी या चित्रपटाने एकूण ७६.६५ कोटींचा गल्ला जमवला होता.

COMMENTS