Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंगणापूर येथे ओवर ब्रीज, स्ट्रीटलाईट बसवण्याची मागणी

ग्रामस्थांच्या वतीने रेल्वे प्रशासनाला दिले विविध मागण्याचे निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथे रेल्वे स्टेशन जवळ येणार्‍या जाणार्‍यासाठी ओवर ब्रिज, स्ट्रीटलाईट व सीसीटीव्ही बसून देण्यात

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी
रत्नदीपच्या अध्यक्षांविरोधात विद्यार्थी, पक्ष संघटनांचा मोर्चा
पढेगाव ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव संमत

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर येथे रेल्वे स्टेशन जवळ येणार्‍या जाणार्‍यासाठी ओवर ब्रिज, स्ट्रीटलाईट व सीसीटीव्ही बसून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखरकारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सेन्ट्रल रेल्वे सोलापूर विभागाचे डिव्हिजनल मॅनेजर यांना रेल्वेचे उच्चस्तरीय अधिकारी हे नुकतेच कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वे लाईनच्या इन्सपेक्शनसाठी आले असता त्यातील मनोज कुमार अग्रवाल यांच्याकडे देण्यात आले.

सदर निवेदन देते प्रसंगी शिंगणापूरचे लोकनियुक्त सरपंच डॉ. विजय काळे, उपसरपंच शाम संवत्सरकर, सदस्य जानराव, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आढाव, प्रमोद संवत्सरकर, साईनाथ जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंगणापुर येथे रेल्वे स्टेशन लगत दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे.सदर लोकांना एका बाजुकडून दुसर्‍या बाजूस जाण्यासाठी रेल्वे स्टेशन मधून जावे लागते. शिंगणापुरचा अर्धा भाग रेल्वे लाईन च्या बाजूस आहे व लोकांना दुसर्‍या बाजुस तालुक्याला जाणे येणे . मुलांना शिक्षणासाठी कामासाठी दवाखान्यात ये जा मोठ्या प्रमाणात करावी लागते. त्यामुळे सदर पायी येणार्‍या जाणार्‍यांची मोठी वर्दळ ही रेल्वे स्टेशन मधून होत असते त्यामुळे यातून काही अनर्थ देखील होऊ शकतो. तरी त्या ठिकाणी ओवर ब्रिज अथवा भुयारी मार्ग झाल्यास पायी येणार्‍या जाणार्‍याना अतिशय सोयीस्कर होईल. तसेच सध्यस्थितीत जो भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रीट लाइट व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्यात यावे.त्याचबरोबर आमच्या गावात रेल्वेस्टेशन असल्याने गावात 80 टक्के कुटूंबाकडे प्रवाशी रिक्षा असून त्यांचे मूळ उदरनिर्वाह च माध्यम देखील तेच आहे त्यामुळे ग्रामपंचायतीला पेड रिक्षा ऑफिससाठी परवानगी द्यावी. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय व लुट होणार नाही. ग्रामपंचायतीने आपणांस घरपट्टी मागणी पत्र दिलेले आहे. तरी अद्याप त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही तरी आपण लवकरात लवकर आमच्या मागण्याची दखल घ्यावी आशा आशयाचे निवेदन शिंगणापूर ग्रामपंचायतिच्या वतीने रेल्वेला देण्यात येऊन मागणी केली आहे.

आता रेल्वे लाईनच्या दुसर्‍या लेन चे काम प्रगतीपथावर असून हे काम पूर्ण होताच या मार्गावर रेल्वे गाड्याची संख्या देखील वाढू शकते जर अस झालं तर पायी रेल्वे स्टेशन मध्ये ये जा करणार्‍या शिंगणापूरच्या ग्रामस्थांना मोठा त्रास होऊ शकतो किंबहुना जीव मुठीत धरून ये जा करावी लागू शकतो त्यामुळे रेल्वे विभागाने लवकरात लवकर आमच्या मागणीचा विचार करावा.

COMMENTS