Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान : शरद पवार

मुंबई : आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला

पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
फटाका कारखान्यात स्फोट, 11 जणांचा मृत्यू
स्त्रियांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज -कविताताई आव्हाड

मुंबई : आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जग, जंगल आणि जंगली इथे ते खरे मालक आहेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे कार्यक्रम पार पडला. सन 2022 चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे दानशूर, परोपकारी अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पवार यांनी भूषविले. राष्ट्रीय एकात्मता, संवैधानिक मूल्यांचे जतन, भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणार्‍या क्षेत्रात भरीव आणि अग्रेसर कार्य करणार्‍या व्यक्तीला किंवा संस्थेला दिल्या जाणार्‍या राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रतिष्ठानतर्फे नामांकन मागविण्यात येतात. पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराने यापूर्वी डॉ. जयंत नारळीकर, आर. के. लक्ष्मण, सुश्री महाश्‍वेता देवी, भारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग, रतन टाटा आदींना सन्मानित करण्यात आले आहे. आज जंगल आणि त्यासंबंधीचा जो संघर्ष होतो. ज्याचा उल्लेख प्रतिभाताईनी आपल्या भाषणात केला. आज खरंच संघर्ष करण्यासाठी जे वरती येतात त्यांचा आदिवासींसंबधी त्यांचे ज्ञान आहे ते ज्ञान एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती देतात असे स्पष्ट करतानाच आजही या देशातील, राज्यातील वनसंपत्ती जी राहिली ती आदिवासींनी सांभाळलेली आहे हा खरा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांचे कर्तृत्व आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले. त्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी त्यांचे अधिकार जतन करण्यासाठी जे लोक प्रयत्नांची परीक्षा आणि वेळ प्रसंगी संघर्ष करतात त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्या लोकांच्या मालिकेमध्ये प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी व्यासपीठावर आहेत ते पाहून शरद पवार यांनी मनापासून समाधान व्यक्त केले. या आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे ध्यानात घेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहका-यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मध्यंतरी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक संमेलन घेतले होते. शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली. आजचा दिवस चव्हाणसाहेबांचा 110 वा जन्मदिवस साजरा करण्याचा महोत्सव आहे. गेले अनेक वर्षे त्यांच्याशी संबंधित असणारे दिवसाचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात साजरे करत आहोत. उभं आयुष्य त्यांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी दिले. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानवयात पितृत्व गमावले आणि मातेच्या छत्रछायेखालील मार्गदर्शनाखाली ज्यांची उभारणी झाली असे हे चव्हाणसाहेब… त्यांची सगळी पार्श्‍वभूमी बघितल्यानंतर महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबात एखादी व्यक्ती जन्माला आली आणि कठीण परिस्थितीत कष्ट करण्याचा प्रयत्न करते याचे उत्तम उदाहरण चव्हाणसाहेबांचे आहे असेही शरद पवार म्हणाले.

COMMENTS