Homeताज्या बातम्या

‘भिक मागो’ आंदोलनातून जमा झालेले पैसे मुख्याधिकाऱ्यांकडे; रस्त्यांची दुरुस्ती व मूलभूत सुविधांची आंदोलकांची मागणी

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी   ‘भिक मागो’ आंदोलन करण्यात आले. करण्यात आलेल्या आंदोलनातून जमा झालेली ४ हजार ११४ रुपयांची रक्कम सोमवारी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आंदोलनादरम्यान नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भिक मागून ही रक्कम जमा करण्यात आली होती. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या घोषणेनुसार ही रक्कम नगरपालिकेला देण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, पावसाळ्यात रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडविणे तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत नागरी सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.  रक्कम सुपूर्त करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, गटनेते तथा नगरसेवक दासू पठारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, नगरसेविका सुनिता थोरात, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहारचे आप्पासाहेब ढुस, काँग्रेस नेते वैभव गिरमे, नानासाहेब कदम, पूनम कदम, श्रीकांत नालकर यांच्यासह महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.  यापूर्वी झालेल्या ‘भिक मागो’ आंदोलनाद्वारे विरोधकांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदविला होता. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनातून जमा झालेली रक्कम मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्त करत आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. आगामी काळात पालिकेकडून विविध क्षेत्रातील विकासात्मक कामे होतील अशी अपेक्षा यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 

डिजिटल मीडियावर मुलांचा विळखा: वाढता धोका आणि उपाय
लेंडी प्रकल्पातील सानुग्रह अनुदान ६ महिन्यांपासून रखडले; धरणग्रस्त शेतकर्‍यांची फरफट सुरू
CJP दिल्ली आंदोलनावर चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान; “दगडांवरील फिंगरप्रिंट्सवरून आधार लिंक करत आरोपींचा शोध!”

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, नागरी सुविधांचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी   ‘भिक मागो’ आंदोलन करण्यात आले. करण्यात आलेल्या आंदोलनातून जमा झालेली ४ हजार ११४ रुपयांची रक्कम सोमवारी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

आंदोलनादरम्यान नागरिकांकडून प्रतीकात्मक स्वरूपात भिक मागून ही रक्कम जमा करण्यात आली होती. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या घोषणेनुसार ही रक्कम नगरपालिकेला देण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, पावसाळ्यात रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडविणे तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत नागरी सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

 रक्कम सुपूर्त करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, गटनेते तथा नगरसेवक दासू पठारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके, नगरसेविका सुनिता थोरात, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहारचे आप्पासाहेब ढुस, काँग्रेस नेते वैभव गिरमे, नानासाहेब कदम, पूनम कदम, श्रीकांत नालकर यांच्यासह महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 यापूर्वी झालेल्या ‘भिक मागो’ आंदोलनाद्वारे विरोधकांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदविला होता. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनातून जमा झालेली रक्कम मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्त करत आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. आगामी काळात पालिकेकडून विविध क्षेत्रातील विकासात्मक कामे होतील अशी अपेक्षा यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 

COMMENTS