Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘OSD’ सांगून फसवणूक

पुणे : शहरात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्वतःला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष अधिकारी अर्

तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ प्रकरणात केवळ ७८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने संशय बळावला; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले गंभीर सवाल!
पुण्यात दारूच्या नशेत मित्राचा केला खून
कुख्यात गुंड सचिन घायवळ राजस्थानातून अटकेतवेषांतर करूनही पोलिसांच्या जाळ्यात ; नऊ महिन्यांपासून फरार

पुणे : शहरात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्वतःला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष अधिकारी अर्थात ओएसडी असल्याचे सांगत एका व्यक्तीने पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून शासकीय यंत्रणांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष अधिकारी असल्याचे भासवून पुण्यातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश मिळवला. कोणतीही अधिकृत ओळखपत्र किंवा खात्रीशीर पडताळणी न करता सरकारी कार्यालयात प्रवेश मिळाल्याने हा प्रकार अधिक गंभीर ठरत आहे. विशेष कर्तव्य अधिकारी हे पद प्रशासनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या कार्यालयीन कामकाजात या पदावरील व्यक्तींचा थेट सहभाग असतो. या पदाच्या नावाचा वापर करून आरोपीने प्रभाव टाकण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फसवणूक व खोटी ओळख वापरण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासात आरोपीने अशाच पद्धतीने इतर ठिकाणीही बनावट ओळख वापरली आहे का, याचा सखोल शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमध्ये येणार्‍या व्यक्तींची ओळख पडताळणी अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच अशा प्रकारच्या बनावट अधिकार्‍यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही पुढे येत आहे. प्रशासनाच्या विश्‍वासार्हतेला धक्का देणार्‍या या घटनेमुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.

COMMENTS