Homeव्हिडीओ

धावत्या ट्रेनखाली अडकल्या ४ महिला, १० डबे अंगावरून जाईपर्यंत रोखून धरला श्वास; बिहारमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल.

https://youtu.be/G_Y5NZtIFXI बिहारच्या समस्तीपूरमधील पटोरी रेल्वे स्टेशनवर काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथे रेल्वे ट्रॅक पार करत

चोरट्यांनी फोडली दुकाने
पंकजांचा धनुभाऊंवर हल्लाबोल | LOKNews24
आंबेगाव पठार येथे रस्त्यावर खड्डे व कचरा दुर्गंधी | Lok News24

बिहारच्या समस्तीपूरमधील पटोरी रेल्वे स्टेशनवर काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. येथे रेल्वे ट्रॅक पार करताना अचानक ट्रेन सुरू झाल्याने चार महिला थेट चालत्या ट्रेनच्या खाली फसल्या. तब्बल १० डब्बे अंगावरून जाईपर्यंत या महिला ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत श्वास रोखून पडून राहिल्या. सुदैवाने या चौघींचाही जीव वाचला आहे, मात्र तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एका लग्नकार्याहून परतत असताना हा अपघात घडला. ९ जण रेल्वे ट्रॅक पार करत होते, त्यापैकी ५ जण सुखरूप बाहेर पडले, पण तीन महिला आणि एक लहान मुलगी मागेच राहिल्या. तितक्यात प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन अचानक सुटली. जी वाचवण्यासाठी या चौघींनीही ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत स्वतःला झोकून दिले. ट्रेन निघून गेल्यानंतर स्टेशनवरील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ममता देवी, जयमाला देवी आणि सोनाली कुमारी अशी जखमी महिलांची नावे असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे ट्रॅक पार करताना केलेली एक छोटीशी चूक किती जीवघेणी ठरू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

COMMENTS