Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू

आमदार सरनाईक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश

अकोला ः अकोल्यातील पातुर शहराजवळ आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .
केरळमध्ये भरधाव स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह 5 जणांचा मृत्यू

अकोला ः अकोल्यातील पातुर शहराजवळ आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झालाय. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील पुलाजवळ दुपारी ही घटना घडली. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत. अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS