Homeताज्या बातम्या

लॉरेन्स बिश्‍नोई गँगच्या 2 गुंडांचे एन्काउंटरप्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते

नवी दिल्ली : हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लॉरेन्स बिश्‍नोई टोळीशी संबंधित दोन कुख्यात गुंडांचा बहादूरगड परिसरात एन्काउंटर केला

बॉलिवूडवर शोककळा; दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
जगातील किमान 70 टक्के लोकसंख्या हवी लसीकृत : डॉ. टेड्रॉस अधानोम
राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन : मंत्री प्रकाश आबिटकर
Lawrence Bishnoi : 'लॉरेन्स बिश्नोई गँगच्या २ गुंडांचे एन्काउंटर'; हरियाणा पोलिसांची मोठी कामगिरी - Dainik Prabhat


नवी दिल्ली : हरियाणा आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लॉरेन्स बिश्‍नोई टोळीशी संबंधित दोन कुख्यात गुंडांचा बहादूरगड परिसरात एन्काउंटर केला. या दोन्ही आरोपींवर हरियाणा पोलिसांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी आत्मसमर्पणाचे आवाहन केल्यानंतरही आरोपींनी गोळीबार केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेत दिल्ली पोलिसांच्या एका जवानाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांना विश्‍वासार्ह सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, जिम चालक कपिल यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेले दोन मुख्य आरोपी हरियाणातील विविध भागांत वावरत असून ते आणखी एका गंभीर गुन्ह्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त नियोजन करून सापळा रचला. मृत आरोपींपैकी प्रवेश हा हिसार परिसरातील रहिवासी होता, तर हिमांशू हा जाखोड खेडा गावातील असल्याची माहिती आहे. दोघेही लॉरेन्स बिश्‍नोई, हरीराम उर्फ हॅरी बॉक्सर आणि अनिल पंडित यांच्या गुन्हेगारी जाळ्याशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. बहादूरगड परिसरात पोलिसांनी आरोपींना घेरल्यानंतर त्यांना शस्त्रे खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यांनी आत्मसमर्पण करण्यास स्पष्ट नकार देत पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. दोन्ही बाजूंमध्ये काही काळ तीव्र चकमक सुरू राहिली. या दरम्यान प्रवेश आणि हिमांशू गंभीर जखमी झाले, तर दिल्ली पोलिसांचे जवान अंकित यांच्या पायालाही गोळी लागली. चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर प्रवेश आणि हिमांशू यांना मृत घोषित करण्यात आले. जखमी जवान अंकित यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS