Homeताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावरील अपघात 5 महिलांचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले असून, सोमवारी रात्री पुणे नाशिक महार्गावर राजगुरूनगर जवळच्या तालुका खेड ये

राष्ट्रपती राजवटीच्या बुमरँगचीच शक्यता जास्त
महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त धडक कारवाईमोर चौक ते छत्रपती चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली
शिर्डी विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले असून, सोमवारी रात्री पुणे नाशिक महार्गावर राजगुरूनगर जवळच्या तालुका खेड येथील शिरोली परिसरात भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात वाहन रस्ता ओलांडणार्‍या महिलांच्या घोळक्यात शिरले, यात 5 महिलांचा मृत्यू झाला असून, यामध्ये 12 महिला जखमी झाल्या आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर येत आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या सर्व महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणार्‍या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. पश्‍चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 महिला गंभीर जखमी झाल्या. दरम्यान या सर्व अपघातग्रस्त महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा-ओरडा झाला, यावेळी याच परिसरातून पोलिस उपनिरीक्षक जात असताना त्यांनी पोलिस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले.

COMMENTS