भिंगारमध्ये निवृत्त लष्करी जवानाकडून हवेत गोळीबार

Homeताज्या बातम्या

भिंगारमध्ये निवृत्त लष्करी जवानाकडून हवेत गोळीबार

अहमदनगर/प्रतिनिधी : लायसन्स (परवाना) असल्याचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीररित्या निवृत्त लष्करी जवानाने काळया रंगाच्या मोठ्या रायफलमधून हवेत गोळीबार केला

“शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते” – भाई सथ्था रात्र शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; डॉ. पारस कोठारी यांचे प्रतिपादन
कर्जत तालुक्यात दहावीचा निकाल उंचावला; विविध शाळांचा शंभर टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४

अहमदनगर/प्रतिनिधी : लायसन्स (परवाना) असल्याचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीररित्या निवृत्त लष्करी जवानाने काळया रंगाच्या मोठ्या रायफलमधून हवेत गोळीबार केला व कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून सार्वजनिक ठिकाणीं मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याची घटना भिंगार परिसरातील जामखेड रोडवरील करांडे मळा येथील अपूर्वा अपार्टमेंट येथे घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी पोलिस हवालदार जलिंदर नामदेव आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. निवृत्त लष्कर जवान संदीप रमेश बांदल (वय 42, राहणार करांडे मळा, भिंगार) हा सोमवारी रात्री भिंगार येथील टोलनाक्यावरून जात असताना त्याने टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली तसेच जाणार्‍या-येणार्‍या वाहनांना टोल भरू नका असे सांगितले. त्यावेळी रात्री गस्त घालणार्‍या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घरी नेऊन सोडले. मात्र, संतापलेल्या निवृत्त सैनिकाने त्याच्याकडील परवानाधारक बंदूक लोड करून घराच्या परिसरात गोळीबार केला व सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शिवीगाळ केली. ही माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी गेले व त्याच्याकडील बंदूक जप्त करून त्याला ताब्यात घेतले.

COMMENTS