संपदा पतसंस्था ठेवीदार महसूलमंत्र्यांना देणार बांगड्यांचा आहेर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संपदा पतसंस्था ठेवीदार महसूलमंत्र्यांना देणार बांगड्यांचा आहेर

अहमदनगर/प्रतिनिधी : संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. पतसंस्थेचा चेअरमन ज्ञानदेव वाफारेला पाठीशी घालत अ

भटकंती करणारांच्या पालावर झाले रक्षाबंधन ;कामरगावच्या रहिवाशांचा अनोखा उपक्रम
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेळ प्रसंगी हुतात्मा होऊ ः राजेंद्र लांडगे
इंदोरीकर महाराजांची एकनाथ शिंदेंच्या बंडावर जोरदार बॅटिंग | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. पतसंस्थेचा चेअरमन ज्ञानदेव वाफारेला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून ठेवीदार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना बांगड्यांचा आहेर देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. महसूल मंत्री नगर दौर्‍यावर आल्यावर त्यांना बांगड्यांचा आहेर ठेवीदार महिला देणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार संपदा पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेचा लवकरात-लवकर लिलाव करून आमच्या ठेवी व्याजासह परत करा या मागणीसाठी संपदा पतसंस्था ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले. यावेळी धर्मनाथ पांडकर,संध्या खुळे, अ‍ॅड.अनिता दिघे, संतोष लांडे, चंद्रकांत खुळे ,पृथ्वीराज मुनोत, अक्षय गांधी, सुरेखा म्हस्के,सुधीर काळे,दिलीप भट, अर्जुन अष्टेकर,माणिक कोंडे,रावसाहेब उगळे,शोभा चन्नर,विलास आहेर, जगन्नाथ झेंडे,राजेंद्र गांधी,बेबी म्हस्के, रमेश ससे उपस्थित होते. संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये तसेच डुप्लीकेट सोनेतारण 6 कोटी रुपये व शासनाच्या वर्ग-2 जमिनीवर नऊ कोटी रुपये कर्ज देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे, असा दावा करून यावेळी ठेवीदार म्हणाले, संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा तो निकटवर्तीय असल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल विभागाकडून केली जात नाही. त्यामुळे ठेवीदारांवर अन्याय होत आहे. महसूल मंत्री थोरात हे वाफारे यांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे मंत्री महोदयांना देखील सहआरोपी करा, अशी मागणी संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून केली.

COMMENTS