Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आ.अशोकराव काळेंनी घेतले श्री महेश्वराचे दर्शन

कोपरगाव : सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी (दि.१९) भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्र

प्रवाशांना स्वच्छ पाणी देणे ही काळाची गरज : कोयटे 
अनुवाद अकादमीमुळे मराठीला जागतिक व्यासपीठ; आ.आशुतोष काळे; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापनेचे स्वागत
खडकीत ‘रोजगार मंदिर’चा प्रारंभ

कोपरगाव : सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी (दि.१९) भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. माजी आमदार अशोकराव काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.

जागृत देवस्थान अशी ख्याती असलेले श्री महेश्वर महाराज देवस्थान कोळपेवाडी व परीसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री महेश्वर महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वात मोठी यात्रा असा या यात्रेचा नावलौकिक असून वर्षभर या ठिकाणी भाविकांची मांदियाळी असते. आमदार आशुतोष काळे यांनी श्री महेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभिकरण करणे आदी कामासाठी ५० लक्ष निधी दिला आहे. त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यास मोठी मदत झाली आहे.

श्री महेश्वर महाराजांची कृपा दृष्टी सर्वावर रहावी अशी प्रार्थना माजी आ.  काळे यांनी यावेळी श्री महेश्वर चरणी केली व सर्व भाविकांना गुढीपाडवा व मराठी नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश्वर यात्रा कमिटीचे सदस्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

COMMENTS