Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानदाराच्या हाती तुरी देऊन महिला पसार; डोंबिवलीतील ज्वेलर्समधून ६ लाख ३७ हजारांचे दागिने लंपास

डोंबिवली : कल्याणजवळील मोहने गावात सोने खरेदीसाठी ग्राहक बनून आलेल्या महिलेने ज्वेलर्स दुकानातून तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊ

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती आंदोलन
परळी येथे पैशांच्या वादातून मित्राकडूनच तरुणाची हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह टाकून अपघाताचा बनाव
मदतीचा फार्स! प्रशासनाने संकटग्रस्त शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला गंभीर आजारी
Crime News: डोंबिवलीतील जवाहिऱ्याची सोने खरेदीत ७० लाखाची फसवणूक - Marathi  News | Dombivli Jeweller Cheated Of Seventy Lakh As Trusted Customers Buy  Gold Without Paying For Months Rds 00 - Latest

डोंबिवली : कल्याणजवळील मोहने गावात सोने खरेदीसाठी ग्राहक बनून आलेल्या महिलेने ज्वेलर्स दुकानातून तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळील एनआरसी गेट परिसरातील ‘किशोर ज्वेलर्स’ येथे घडली. फिर्यादी किशोर हिरामण जैन (वय ५३) यांचे हे दुकान आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजता एक महिला दुकानात आली आणि स्वतःला ग्राहक असल्याचे भासवत सोन्याचे नेकलेस आणि इतर दागिने पाहिले. त्याचवेळी तिने फोन आल्याचा बहाणा करत “मी दोन मिनिटांत येते” असे सांगितले आणि हातातील दागिने घेऊनच दुकानाबाहेर पडली.

बाहेर आधीच उभ्या असलेल्या रिक्षात बसून ती काही क्षणांत पसार झाली. बराच वेळ ती परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिला चोराचा शोध सुरू केला आहे.

COMMENTS