Homeताज्या बातम्या

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या धाडींनंतरही नरसीत देहव्यापार सुरूच; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नांदेड : नायगाव तालुक्यातील नरसी येथे देहव्यापाराविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून सातत्याने कारवाया होत असतानाही हा अवैध व्यवसाय पुन्हा सुरू

मुंबईत ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीची मोठी कारवाई; तब्बल ३३२ कोटींची मालमत्ता जप्त, आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका
कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; आरोग्य विभागाचा माजी उपसंचालक सूत्रधार
अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकन संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे हवेतच केली नष्ट
नागपूर : गंगाजमुनातील तरुणींचा खापरखेड्यात देहव्यापार | Young women of  Gangajamuna prostitution in Khaparkhedi

नांदेड : नायगाव तालुक्यातील नरसी येथे देहव्यापाराविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून सातत्याने कारवाया होत असतानाही हा अवैध व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या महिन्यांपूर्वी झालेल्या धाडीनंतर पुन्हा बसस्थानक परिसरातील दोन लॉजवर कारवाई झाल्याने या प्रकारामागील साखळी उघड करण्याची मागणी होत आहे.

२५ जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर, परिविक्षाधीन अधिकारी पडवळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या पथकाने नरसी येथील आशीर्वाद आणि आनंद लॉजवर संयुक्त धाड टाकली. कारवाईदरम्यान सात महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लॉज मालक पांडुरंग शिरगिरे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून देहव्यापार सुरू असल्याची खात्री करून त्यानंतर छापा टाकल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरातील राज बारवर चार महिन्यांपूर्वीही उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या पथकाने कारवाई करून परराज्यातील सात महिलांची सुटका केली होती. वारंवार धाडी होत असतानाही नरसी बसस्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरात पुन्हा अशा प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू झाल्याने स्थानिक पोलीस यंत्रणेच्या देखरेखीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस ठाण्याच्या कामकाजाची चौकशी करून या रॅकेटमागील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणार्‍यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, स्थानिक पोलिसांचे या व्यवसायाला पाठबळ असल्याचे आरोप आणि चर्चा सुरू असल्या तरी त्यासंदर्भात कोणताही अधिकृत पुरावा किंवा पोलीस विभागाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आणि अधिकृत निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.

COMMENTS