Homeव्हिडीओ

२२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! नीट परीक्षेच्या गोंधळावर वर्षा गायकवाडांचा तीव्र संताप

https://youtu.be/stx8lv7NTdA एनटीएच्या नीट-युजी परीक्षेतील गोंधळ आणि पेपर लीक प्रकरणावरून काँग्रेस खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केंद्र

स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार करिअरची निवड होणे आवश्यक-प्रो. डॉ. सतीश दांडगे
एमपीएससीच्या गुणवंत उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’अंतिम निवड न झालेल्यांनाही रोजगाराच्या नव्या संधी

एनटीएच्या नीट-युजी परीक्षेतील गोंधळ आणि पेपर लीक प्रकरणावरून काँग्रेस खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. देशातील मुलांचे भवितव्य सध्या धोक्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची खरी जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुले ही आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती आहेत, त्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल प्रशासनात समर्पणाची भावना असणे गरजेचे आहे. मात्र, नीट परीक्षेत वारंवार पेपर लीकच्या घटना घडत असतानाही कोणाचीही जबाबदारी निश्चित केली जात नाही; दोषी अधिकाऱ्यांची केवळ बदली केली जाते, पण मूळ समस्येवर ठोस कारवाई होत नाही. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फिरत असल्याच्या आरोपानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. या गोंधळामुळे देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, मानसिक तणावामुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यासारख्या अत्यंत दुर्दैवी घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता उद्या, २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष असून, काँग्रेससह सर्वच विरोधकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच नीट परीक्षेतील हे वारंवार होणारे गैरप्रकार कायमचे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी अत्यंत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी देशभरातून जोर धरत आहे.

COMMENTS