Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कर्जतचे उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांचा राजीनामा

कर्जत : नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संतोष सोपान मेहेत्रे यांनी त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा  नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्याकडे दिला आहे. राजीनामा दिलेल्या पत्राची साक्षांकित प्रत त्यांनी पत्रकारांना दिली. यामुळे पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायत मध्ये नाट्यमय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यासंदर्भात उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना संपर्क केला असता त्यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या आदेशाने माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा  दिला असून सत्ता परिवर्तनाच्या वेळी ठरल्याप्रमाणे  पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. मेहत्रे यांनी पुढे सांगितले की, मी दिलेला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा पत्र नगराध्यक्ष यांनी स्वीकारलेले नाही. मात्र सभापती राम शिंदे यांच्या सूचनेनुसार पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या संदर्भात नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी मागील दोन दिवसांपासून वैयक्तिक कामामुळे बाहेरगावी आहे. यामुळे याबद्दल मला काही माहिती नाही. आणि  उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी आपणाकडे उपनगराध्यक्ष  पदाच्या राजीनाम्याचे  पत्र अद्याप पर्यंत दिलेले नाही असे सांगितले. 

विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
एलपीजी गॅसवरून संसदेत खडाजंगी; सत्ताधारी-विरोधकांमध्ये तीव्र वाद, राज्यसभेचे वातावरण तापले
मढेवडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी वाबळे; नाशिकहून मित्रपरिवार श्रीगोंद्यात

कर्जत : नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष संतोष सोपान मेहेत्रे यांनी त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा  नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्याकडे दिला आहे. राजीनामा दिलेल्या पत्राची साक्षांकित प्रत त्यांनी पत्रकारांना दिली. यामुळे पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायत मध्ये नाट्यमय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यासंदर्भात उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना संपर्क केला असता त्यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या आदेशाने माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा  दिला असून सत्ता परिवर्तनाच्या वेळी ठरल्याप्रमाणे  पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. मेहत्रे यांनी पुढे सांगितले की, मी दिलेला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा पत्र नगराध्यक्ष यांनी स्वीकारलेले नाही. मात्र सभापती राम शिंदे यांच्या सूचनेनुसार पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान या संदर्भात नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी मागील दोन दिवसांपासून वैयक्तिक कामामुळे बाहेरगावी आहे. यामुळे याबद्दल मला काही माहिती नाही. आणि  उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांनी आपणाकडे उपनगराध्यक्ष  पदाच्या राजीनाम्याचे  पत्र अद्याप पर्यंत दिलेले नाही असे सांगितले. 

COMMENTS