Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

छत्तीसगडमध्ये महिला नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलवादी कमांडरचा मृत्यू झाला. छो

दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!
कल्याणमध्ये कुख्यात गुंड पोलिसांच्या ताब्यात
जावेद जाफरींच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक


रायपूर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलवादी कमांडरचा मृत्यू झाला. छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात ही कारवाई पार पडली. ठार झालेल्या महिला कमांडरचे नाव रूपी असून तिच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षादलांचे पथक जंगल भागात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांशी त्यांचा संपर्क आला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार सुरू झाला. या चकमकीदरम्यान रूपी हिला ठार करण्यात आले. घटनास्थळावरून एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह तसेच एक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून इतर नक्षलवाद्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कारवाईबाबत अधिक तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, 31 मार्च रोजी राज्य सरकारने छत्तीसगडला सशस्त्र माओवादी प्रभावातून मुक्त राज्य घोषित केले होते. त्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच ही चकमक घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नक्षलविरोधी कारवायांची तीव्रता आणि धोरणांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS