Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यूटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून नऊ लाखांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून संर्पक करुन हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे राहणार्‍या विक्रम बाळासाहेब जमदाडे (वय-29) यास

घराच्या शोधातील व्यक्तीची साडेचार लाखाची फसवणूक
शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक

पुणे/प्रतिनिधी ः व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून संर्पक करुन हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे राहणार्‍या विक्रम बाळासाहेब जमदाडे (वय-29) यास तीन युटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून त्याची ऑनलाइन आठ लाख 97 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी तीन अनोळखी आरोपी विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. शुभांगी रुथ, गौतम गोल्ड फायनान्स व आराध्या अग्रवाल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. सदरचा प्रकार 14 ते 31 मार्च दरम्यान घडलेला आहे. तक्रारदार विक्रम जमदाडे यांना संबंधित आरोपींनी संगनमत करुन कट रचून व्हाटसअप तसेच टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून संर्पक साधला. त्यांचे सोबत चॅटिंगच्या माध्यमातून संभाषण करुन त्यांना तीन युटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगुन आरोपींनी त्यांचे युपीआय आयडी व बँक खात्यावर वेळोवेळी एकूण आठ लाख 97 हजार रुपये भरण्यास सांगून त्यांनी गुंतवलेले पैसे परत न करता सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे. पतीने संगनमत करुन कट रचून पत्नीसोबत कौटुंबीक कारणावरुन वाद केला. त्यानंतर तिला घराबाहेर काढून तिचे घरात राहिलेले चेकबुकचा वापर करुन इतर आरोपींनी संगनमत करुन पत्नीची बनावट सही करुन, बनावट सही असलेल्या चेकचा वापर करुन तिच्या खात्यातून परस्पर पाच लाख 85 हजार रुपये काढून तिची फसवणूक केली.तर, सासु व सासरे यांनी सुनेच्या बँक खात्यातील रक्कम त्यांचे बँक खात्यावर वळते करुन फसवणूक केली. महिलेने पैशाबाबत सासरचे व्यक्तींना फोन केला असून तिला धमकी देण्यात आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेचा पती, सासु, सासरे व दीर यांचेवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS