Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव भांगेंना पैश्यापुढे नातेवाईकही दिसेना

सामाजिक न्याय विभागातील अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांचा छळ

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागातील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडत असतांना,

त्या’ 6 खासगी सावकारांची पोलिस करणार चौकशी ?
श्रीमती जयश्री सोनकवडेंसह तीन अधिकार्‍यांवर दखलपात्र गुन्हा दाखल
सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागातील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडत असतांना, या विभागात गैरकारभाराची मुळे किती खोलवर रूजली असल्याची माहिती समोर येत आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिच सुमंत भांगे मराठवाड्यातील असल्यामुळे त्यांचे नातेवाईक देखील समाज कल्याण विभागात कार्यरत आहे. या नातेवाईकांना प्रादेशिक उपायुक्त असलेल्यांनी सळो की पळो करून सोडले आहे. विशेष म्हणजे या नातेवाईकांची कोणतीही चुकी नसतांना, त्यांचा छळ होत आहे. याविरोधात त्यांनी सचिव भांगे यांच्याकडे दादा मागितली असता, त्यांनी या दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचा प्रकार या विभागात घडतांना दिसून येत आहे. तो केवळ पैश्यापुढे नातेवाईकही गौण ठरतांना दिसून येत आहे.
          छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रादेशिक विभाग अंतर्गत परभणी जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांना विनाकारण कारणे दाखवा नोटीसा बजावून त्यांचा मानसिक छळ करण्यात येत आहे. उपायुक्तांच्या त्रासाला कंटाळून सहाय्यक आयुक्त या रजेवर निघून गेल्या आहेत. केवळ सहाय्यक आयुक्तच या छळाला बळी पडल्या असे नाही, तर या विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्रासाला कंटाळल्याचे दिसून येत आहे. यासोबतच प्रादेशिक कार्यालयात कार्यरत एका कर्मचार्‍याचा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकाचा गाडीवरून पडून हात मोडला आहे. त्यांना डॉक्टरांनी आराम घेण्यास सांगितले आहे, तरी त्यांना रजा न देता सकाळी 8 वा. बोलावून रात्री 9-10 वाजेपर्यंत कार्यालयात थांबून काम करून घेतले जाते. गृहपाल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे कार्यरत आहेत. त्यांना देखील अर्वाच्य शिवीगाळ केल्यामुळे हार्ट-अटॅक आला व ते लाईफ-लाईन हॉस्पिटल बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत आहेत. सचिव भांगे यांच्या नातेवाईकांनी त्यांना विनंती करूनही त्यांनी या दोषींवर कारवाई करण्याची कोणतीही तयारी दाखवली नाही. कारवाईचे सोडाच, मात्र समज देवून, देखील सदर प्रकरण मिटवता आले असतेे, मात्र आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार असून, तक्रार करणार्‍या आपल्याच नातेवाईकांना वार्‍यावर सोडण्याचा हा प्रकार असून, या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आता दाद तरी कुठे मागायची असा सवाल उपस्थित होत आहे.

मानसिक छळामुळे मागणार इतरत्र बदली- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रादेशिक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या होणार्‍या छळाला कंटाळले असून, त्यांनी आता या विभागातून इतरत्र बदली मागण्याचा त्यांचा विचार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS