Homeताज्या बातम्याशहरं

लोणंदमध्ये तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्य विभागालाच सलाईनसह इंजेक्शनची गरज

लोणंद : उघडण्यावर असणारे गटार. (छाया : सुशिल गायकवाड) नगरपंचायत मध्ये निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी तरी आपल्याला प्रभागात लक्ष द्यायला हवे. कुठे

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 323 स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन
इस्लामपूर येथे एका व्यासपीठावर 35 जुळी; मुक्तांगण प्ले स्कूलचा अनोखा उपक्रम
कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांचा धक्कादायक निकाल

नगरपंचायत मध्ये निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी तरी आपल्याला प्रभागात लक्ष द्यायला हवे. कुठे गटार तुंबले आहे का? गटारे स्वच्छ केली आहेत का? स्वच्छ केली नसेल तर ती स्वच्छ करण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत. माझा प्रभाग कसा स्वच्छ राहील यासाठी आरोग्य विभागाकडून काम करून घेणे हे ज्या-त्या प्रभागातील लोकप्रतिनिधीची यांची जबाबदारी आहे. आरोग्य विभाग जर काम करत नसेल तर तुम्ही त्या प्रभागात लोकप्रतिनिधी असून ही नसल्यासारखे आहात. असेच तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांना म्हणावे लागेल.

लोणंद / प्रतिनिधी : काही दिवसांवरच श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा येऊन ठेपलेला असून लोणंद, ता. खंडाळा येथे अजूनही आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही मोहीम हाती घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पालखी तळावर जय्यत तयारी सुरू असली तरी लोणंदच्या अनेक प्रभागातून अंतर्गत भागातून अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
स्वच्छ लोणंद, सुंदर लोणंद या वाक्याप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत लोणंदकरांचा पूर्णपणे विश्‍वास घात नगरपंचायतीकडून तसेच संबंधित आरोग्य विभागाकडून होत आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही समस्या सांगितली तरी आरोग्य विभागाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. कोणत्याही समस्याचे निराकारण आरोग्य विभागाकडून होत नाही. आरोग्य विभागाच्या बाबतीत अनेक तक्रारी सुध्दा लोणंदकर नागरिक करू लागले आहेत. लोणंद शहरातील स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आरोग्य विभागाला आता सलाईन, इंजेक्शन देण्याची वेळ आली आहे. यातून कामे करण्याची ऊर्जा आणि सक्षमता आली तर हे आरोग्य लोकांच्या आरोग्याकडे लक्ष तरी देतील, असे वाटू लागले आहे.
लोणंद येथे वेळच्या वेळेस गटार स्वच्छ न केल्यामुळे तुंबलेल्या अवस्थेत गटारे पाहायला मिळत आहेत. लोणंदच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये गटार इतके तुंबलेले आहे की त्या गटारातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर तर येऊ लागले आहे. शिवाय या गटारात प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच सांडपाणी यांमुळे घाणीच्या साम्राज्याचा उदयच झालेला पाहायला मिळत आहे. हे गटार जुन्या एमएससीबी ऑफिसच्या परिसरात असून इथे घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे गटार स्वच्छ करणे आवश्यक बनले आहे. तुंबलेल्या गटारांना मोकळा श्‍वास हवा आहे. यासाठी गटारे स्वच्छ करणारी टीम इथे दाखल झाली पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये जगत असलेल्या कोणत्याही नागरिकाला अस्वच्छतेमुळे आजारी पडावे लागणार नाही. ही खबरदारी नगरपंचायतीने घ्यायला हवी. स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. परंतू गटारे तुंबण्याची वेळ का येऊ दिली जात असते. ज्या-त्या वेळी ही गटारे स्वच्छ का केली जात नाहीत? इथे डोळ्यासमोर घाण झालेली गटारे दिसत असताना ती गटारे स्वच्छ केली जात नाहीत. तसेच अडचणीत असलेली गटारे कधी स्वच्छ होतील, असा प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे. त्यामुळे अशा गटारांकडे बघायला कुणाला वेळ नाही.
लोणंद शहरातील तुंबलेली गटारे फक्त पालखी सोहळ्यापुरती स्वच्छ न करता ती कायम स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्यासाठी कोणताही धोका निर्माण होणार नाही. हे लक्षात घ्यायला हवे.

COMMENTS